Shrirampur Water Crisis Sakal
अहिल्यानगर

Shrirampur Water Crisis : श्रीरामपूरचा पाणीप्रश्‍न पेटणार; कानडे, मुरकुटे, ससाणेंसह शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

भंडारदरा धरणातून गेल्या १७ ते १८ दिवसांपासून सिंचनाचे आवर्तन सुरू आहे. श्रीरामपूर तालुका हा टेलचा भाग आहे.

सकाळ वृत्तसेवा

श्रीरामपूर : भंडारदरा धरणातून सिंचनाचे आवर्तन कमी दाबाने सुरू असल्याच्या मुद्दा सर्व प्रथम ‘सकाळ’ने प्रकाशझोतात आणला. त्यानंतर आमदार लहू कानडे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे व शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी यात उडी घेत आंदोलनाचा इशाला दिला आहे. यामुळे पूर्ण दाबाने पाणी न मिळाल्यास श्रीरामपूरचा पाणीप्रश्न पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  

भंडारदरा धरणातून गेल्या १७ ते १८ दिवसांपासून सिंचनाचे आवर्तन सुरू आहे. श्रीरामपूर तालुका हा टेलचा भाग आहे. टेलच्या भागाला सर्व प्रथम पूर्ण दाबाने पाणी सोडणे आवश्यक असतानाही श्रीरामपूर तालुक्याला कमी पाणी सोडण्यात आले.

त्यामुळे अनेक गावांतील शेतकऱ्यांचे भरणे राहून गेले आहे. आधीच कडाक्याचे ऊन, त्यात सिंचनाचे आवर्तन सुटूनही पाणी न मिळाल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अनेक गावात पाणीटंचाई जाणवू लागली आहे.

यासंदर्भात आमदार कानडे यांनी पाटबंधारे विभागाला गावतळे भरून देण्याची सूचना केली होती. मात्र, त्याकडेही सपशेल दुर्लक्ष करण्यात आले. १८० क्युसेकने पाणी सोडणे आवश्यक असताना ते केवळ ७० क्सुसेकने मिळाले.

याचा दाखलाच येथील वडाळा पाटबंधारे शाखेतील अभियंत्यांनीब ‘सकाळ’शी बोलताना दिला. त्यानंतर तालुक्यातील सर्वच राजकीय नेते खडबडून जागे झाले आहेत. शेतकऱ्यांप्रती असलेली कणव दाखविताना सर्वांनीच पाटबंधारे विभागाला घेराव घालण्याचा, मोर्चा काढण्याचा व टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान, कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे यांनी उद्यापासून पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, ते कितपत सत्यात उतरेल हे येणाऱ्या काळातच ठरेल. सध्या उन्हाने लाहीलाही होत असताना त्यामुळे पाणी प्रश्नावरून पडणाऱ्या ठिणगीमुळे संघर्ष अटळ असल्याची बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA 4th T20I: हे काहीतरी वेगळंच! भारत-दक्षिण आफ्रिका सामना पावसामुळे नाही, तर या गोष्टीमुळे उशीरा सुरू होणार

Railway News: आता तिकीट कन्फर्म होणार की नाही हे 10 तास आधीच समजणार; वेटिंग-RAC प्रवाशांना मोठा दिलासा

IPL 2026 Auction: 'खर्च कसा करणार हा...' CSK ने बोली लावलेल्या प्रशांत वीरसाठी रिंकू सिंगसह UP संघातील खेळाडूंचा बसमध्येच जल्लोष

Mumbai News: मुंबई कोस्टल रोडसाठी 9 हजार झाडे तोडणार! बीएमसीचा मोठा निर्णय; वाचा प्रकल्पाचा सविस्तर आराखडा

Expressway Toll System : आता ‘एक्स्प्रेसवे’वर टोल भरण्यासाठी गाडी थांबवून वाट पाहण्याची गरज नसणार!

SCROLL FOR NEXT