Accident death esakal
अहिल्यानगर

ओव्हरटेक बेतला जिवावर; सख्या बहीण-भावाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

श्रीगोंदे (जि. अहमदनगर) : निमगावखलू (ता.श्रीगोंदे) येथून दौंडला शाळेत चाललेल्या सख्या बहीण व भावाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना दौंड येथील भीमा नदीच्या पुलाजवळ आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

आज (ता. 31) सकाळी हे दोघे बहीण भाऊ दौंड येथे शाळेत जाण्यासाठी निमगाव खलू येथून दौंडकडे जात होते. हॉटेल धनश्री समोर जुन्या टोल नाक्याजवळ एका टेम्पोला ओव्हरटेक करण्याच्या नादात दौंडकडून नगरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव पिकअपने या दोघा बहीण भावाना समोरून जोराची धडक दिली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.

अनुष्का गणेश शिंदे (वय १६) व आदित्य गणेश शिंदे (वय १४) दोघे निमगावखलू अशी अपघातात मृत्यू पावलेल्या बहीण भावाची नावे आहेत. गरीब कुटुंबातील या सख्या बहीण भावाचा असा करूण अंत झाल्याने निमगावखलू गावासह परिसरावर शोककळा पसरली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime : शिवाजीनगर हत्या प्रकरणात मोठी कारवाई; मुख्य आरोपी नदीमचा साथीदार 'रिझवान DJ'ला अटक, 40 लाखांचे अमली पदार्थ जप्त

Pune News: महसूल विभागाचा निर्णय! राज्यातील ११ अपर जिल्हाधिकारी, ६९ अपर तहसील कार्यालयांची नव्याने होणार निर्मिती..

मालवणच्या समुद्रकिनारी एकाचवेळी ७५ डॉल्फिनचा कळप, ड्रोनने टिपले दुर्मिळ आणि विहंगम दृश्य; पाहा VIDEO

Ration Shop Onion Supply : रेशन दुकानात मिळणार स्वस्त कांदा, कृषी मूल्य आयोग उपसमितीचा अहवाल; अतिरिक्त पुरवठाकाळातील प्रभावी उपाय

Latest Marathi News Live Update : माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पत्नीचे निधन, सिल्लोड येथे आज अंत्यसंस्कार

SCROLL FOR NEXT