Siddhatek ganeshotsav sakal
अहिल्यानगर

Siddhatek : थाई गणेशभक्त सिद्धिविनायकचरणी

चैतन्यदायी गणेशोत्सव पाहण्यासाठी परदेशी भाविकांची उपस्थिती लक्षणीय

सचिन गुरव

सिद्धटेक : सध्या सर्वत्र सुरू असलेला चैतन्यदायी गणेशोत्सव पाहण्यासाठी परदेशी भाविकांची उपस्थिती लक्षणीय ठरते आहे. हजारो किलोमीटर अंतर पार करीत, भल्या मोठ्या गणेशमूर्तीसह गणेशोत्सवाचा मनमुरादपणे आनंद लुटणारे हे भाविक आहेत थायलंडचे. अत्यंत शांत व मितभाषी असणारी ही मंडळी दर वर्षी अष्टविनायक यात्रा करतात. सुमारे तीन वर्षांपासून खंडित झालेली ही यात्रा आता पुन्हा सुरू झाल्याने त्यांचा उत्साह अवर्णनीय आहे.

थाई गणेशभक्त व श्रीगणेशाचे नाते इतिहासात सातव्या शतकापासून आढळते. अत्यंत भक्तिभावाने हे भाविक गणेशाची पूजाअर्चा करतात. जागतिक पातळीवर सर्वांत जास्त गणेशमंदिरे थायलंडमध्ये आढळतात. तेथील उत्सवाचे नियोजन करून दर वर्षी हे भाविक महाराष्ट्रातील प्रसिद्ध अष्टविनायक यात्रा करतात.

२०-२५ भाविकांचे ठरावीक गट टप्प्या-टप्प्याने प्रसिद्ध गणेशस्थानांना भेट देतात. मोठमोठ्या गणेशमूर्तीसह ते विविध गणेश मंदिरांमध्ये जाऊन तेथे आरती करतात. त्या ठिकाणी श्रीगणेशाच्या पूजेसाठी आवश्यक सामग्रीची श्रद्धेने यथेच्छ खरेदी करतात. दरम्यान, येथे उपस्थित विद्यार्थ्यांशी त्यांनी हितगूज केले.

आमच्या देशात आयुद्या शहरात सर्वाधिक गणेशमूर्ती आहेत. राजधानी बँकॉकमधील बँकॉक नॅशनल म्युझियममध्येही अनेक प्रकारच्या गणेशमूर्ती आहेत. महाराष्ट्रातील श्रीगणेशाची तीर्थक्षेत्रे खूपच सुंदर आहेत.

-बुधसाबा थांगजान, थाई भाविक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT