The sisters and brothers from Yavatmal got stuck in the rules 
अहिल्यानगर

नियम-अटीत अडकले यवतमाळचे भावंडे

सूर्यकांत वरकड

नगर : निवारागृहात महिनाभरापासून अडकल्याने बहिण-भाऊ अक्षरक्ष: वैतागले आहेत. गावी जावं, तर तेथे नात्यातील कोणी नाही. पतीकडे जायचंय; पण परवानगी मिळत नाही. सोबतचे सगळे गावी निघून गेले. मात्र, नियम व अटीच्या जोखडात बहीण-भावावर निवारा केंद्रात राहण्याची वेळ आली आहे. प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने, त्यांच्यात नैराश्‍य आले आहे. 

नागापूर एमआयडीसीमधील गिते पाटील लॉन निवारा केंद्रात अडकून पडलेल्या दोन भावंडाची ही कथा. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने देशात लॉकडाउन जाहीर केले. त्यामुळे बाहेरच्या लोकांची राहण्याची व्यवस्था निवारा केंद्रात करण्यात आली. नगर-पुणे रस्त्यावरील विविध मंगल कार्यालयात निवारा केंद्र उभारून त्यांना तेथे मोफत जेवण दिले जाते.

ऑनलाईन अर्ज नाकारला

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, यवतमाळ आदी ठिकाणच्या 82 जणांना 16 एप्रिल रोजी एमआयडीसीतील गिते पाटील लॉन निवारा केंद्रात ठेवले होते. वैद्यकीय तपासणीनंतर काहींना घरी सोडले. परंतु, यवतमाळ येथील भावंडे येथेच अडकून पडले आहेत. गावी जावे, तर तेथे हक्‍क्‍याचे कोणी नाही. त्यामुळे महिलेने पतीकडे सणसवाडी (पुणे) येथे जाण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ऑनलाईन अर्जही केला. परंतु, त्यांचा अर्ज नाकारण्यात आला.

पत्र आणा, मग सोडतो

त्यांनी तहसीलदारांशी संपर्क साधला. मात्र, जेथे जायचे आहे, तेथील अधिकृत पत्र असल्याशिवाय सोडणार नाही, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बजाविले. पत्र आणा, मग सोडतो, असे सांगितले. सणसवाडी येथून पत्र कसे आणणार, असा प्रश्‍न त्यांना पडला आहे. प्रशासनाच्या नियम-अटीत ही भावंडे निवारागृहात अडकून पडली आहेत. 

प्रशासन परवागी देत नाही

गेल्या महिनाभरापासून आम्ही निवारागृहात आहोत. आता आम्हाला सणसवाडीला पतीकडे जायचे आहे. आमच्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्रही आहे, तरी प्रशासन परवागी देत नाही. आमच्याकडील पैसेही संपले आहेत. तेथे कंपन्या सुरू झाल्याने, काही कामधंदा करता येईल. 
- बहिण-भावाची प्रतिक्रिया 

पत्र आणणे आवश्‍यक

"त्या' भावंडांना यवतमाळला नव्हे, तर सणसवाडीला जायचे आहे. परंतु, ते ज्या कंपनीत काम करतात, तेथून तसे लेखी पत्र आणणे आवश्‍यक आहे. त्यानंतर त्यांना तेथे पाठविण्यात येईल. 
- उन्मेष पाटील, तहसीलदार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune DJ Sound : डीजेसाठी आग्रही मंडळांच्या मागणीपुढे पोलिसांची नरमाईची भूमिका; चार बेस, चार टॉपला परवानगीची तयारी

China Alerts: पुढील तीन दिवसांत पुन्हा महापुराचा धोका! चीनकडून नेपाळला इशारा, नेमका अलर्ट काय?

Pune Processions : मिरवणुकांमध्ये नियमांचे उल्लंघन; सहा ठिकाणी कारवाई, ध्वनिक्षेपक यंत्रणाही जप्त

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Pune News : ‘बीपीसीएल’चा कचरा प्रकल्प स्थायीने अडवला; बिनाखर्चाच्या प्रस्तावासाठी विशेष सभा घेणार

SCROLL FOR NEXT