Maratha_Reservation 
अहिल्यानगर

सकल मराठा समाजाच्या वतीने 17 ऑक्टोबरला ठिय्या आंदोलन

शांताराम काळे

अकोले (नगर) : मराठा समाजाच्या आरक्षणासहित विविध मागण्यांसाठी 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता ठिय्या आंदोलन व अकोले तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा सकल मराठा समाजाचे वतीने आयोजित करण्यात आला आहे.

अकोले येथील हुतात्मा स्मारक येथे आयोजित सकल मराठा समाजाची बैठक झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष राज गवांदे सर होते. यावेळी भाजपचे जेष्ठ नेते तथा जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव, भाजप तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे, अकोले एज्युकेशन संस्थेचे सचिव यशवंतराव आभाळे आदी उपस्थित होते.

या बैठकीत मराठा आरक्षण या सरकारने कोर्टात टिकवले नाही, याचा निषेध या बैठकीत करण्यात आला. मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेश अध्यक्ष संभाजीराव दहातोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन करण्यात येणार आहे. तत्कालीन मंत्री मधुकरराव पिचड यांनी मराठा आरक्षणाचा विषय चांगल्या पध्दतीने हाताळले होते. 

युवा नेते माजी आमदार वैभवराव पिचड, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सिताराम पा.गायकर, जेष्ठ नेते मधुकरराव नवले, जिल्हा परिषद सदस्य कैलासराव वाकचौरे, भाजप जिल्हा सरचिटणीस जालिंदर वाकचौरे, जेष्ठ नेते शिवाजीराव धुमाळ, ऍड.वसंतराव मनकर यांच्या मार्गदर्शनाखाली गावोगावी जाऊन समाज जनजागृती करून या सरकारला जागे करण्यात येणार आहे. तालुक्यातील काही प्रवृत्ती मराठा समाजाचे नेत्यांना डावलून आंदोलन करण्याचा घाट घालीत आहे. या सर्व नेत्यांनी मराठा क्रांती मोर्चात तन, मन, धनाने सहभागी झाले होते. या सर्वांना या मोर्चात सहभागी करून घेण्याचे या बैठकीत ठरले.

'मराठा समाजाला राज्य सरकारनं फसवलं आहे. राज्य सरकारच्या हातात ज्या गोष्टी आहेत, त्या ते का करत नाही? आरक्षण हा समतेचा लढा आहे. आरक्षण आमच्या हक्काचं आहे आणि आम्ही ते मिळवणारच. सरकारने सारथी संस्थाही बुडीत घातली. अण्णासाहेब पाटील महामंडळाला सरकारने काय दिलं? राज्य सरकारने त्याचा खेळखंडोबा केला. ते मराठा समाजासोबत किती खेळणार? मराठा समाजातील आमदारांनीसुद्धा याची जबाबदारी घ्यायला हवी.' अशी तीव्र भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. पोलीस भरती, एमपीएससी परीक्षा बंद करण्यासाठी सर्वांनी सजग राहायचं असेही यावेळी सर्वांनी ठरवले.

यावेळी अरुण शेळके, सुनील उगले, नगरसेवक सचिन शेटे, राहुल देशमुख, ज्ञानेश पुंडे, मदन आंबरे, अमोल गोडसे यांनी विविध सूचना केल्या. आंदोलन यशस्वी करण्यासाठी भानुदास गायकर, शेतकरी मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष अशोक आवारी, विकास नरवडे, युवकचे ओम काळे, मराठा महासंघाचे सरचिटणीस कैलास जाधव, उपाध्यक्ष भाऊसाहेब हाडवळे, बाळासाहेब कोकाटे, अक्षय आभाळे, मिलिंद हुलवळे, विकास तळेकर हे प्रयत्न करणार आहेत.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठा महासंघाचे जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब वाकचौरे यांनी तर आभार युवक मराठा महासंघाचे उपाध्यक्ष सुशांत वाकचौरे यांनी मानले

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hajare Karandak : मुंबई संघाचा विजयी चौकार; ४४४ धावांचा डोंगर, सर्फराझचे झंझावाती दीडशतक

Nashik Municipal Election : नाशिकमध्ये 'महायुती'चा गोंधळ! राष्ट्रवादीने २१ की ४१ जागा लढवायच्या? नेत्यांकडेच उत्तर मिळेना

Viral Video: रिलसाठी जीवाशी खेळ नडला ! शरीराला आग लावून धावत्या बाईकवर स्टंट अन् पुढच्या क्षणात नको तेच घडलं; धडकी भरवणारा व्हिडिओ

Udayanraje Bhosale: मित्र नगराध्यक्ष होताच उदयनराजेंच्या डोळ्यात आनंदाश्रू; मध्यरात्रीच गाठलं कराड, शिवसेना नेत्याच्या गळाभेटीने चर्चांना उधाण!

आधी वेळ बदलली, आता मालिकाच बंद होणार; फक्त ८ महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेणार स्टार प्रवाहची मालिका, पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT