Six more corona patients discharged in the Nagar 
अहिल्यानगर

गुड न्यूज... नगरमधील आणखी सहा जणांना डिस्चार्ज! 

सकाळ वृत्तसेवा

नगर : जिल्ह्याची वाटचाल आता "ऑरेंज झोन'कडून "ग्रीन झोन'कडे सुरू झाली आहे. जामखेड येथील दोन व संगमनेर येथील चार कोरोनाबाधित रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. या सहा रुग्णांना आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वागत करून निरोप दिला. जिल्ह्यातील 45 कोरोनाबाधितांपैकी 34 रुग्ण आजपर्यंत कोरोनामुक्त झाल्याने, ही जिल्हावासीयांसाठी "गुड न्यूज' ठरली आहे. 

जिल्ह्यातील 45 कोरोनाबाधित रुग्णांपैकी रुग्णालयात सध्या आठ जण उपचार घेत आहेत. तीन रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या 18 व्यक्तींच्या घशातील स्राव नमुन्यांपैकी 16 व्यक्तींचे अहवाल आज प्राप्त झाले. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आहेत.

जामखेडमध्ये दोघे संस्थात्मक देखरेखीखाली

संगमनेर येथे चार नेपाळी व्यक्ती 14 दिवसांकरिता क्वारंटाईन करण्यात आल्या होत्या. त्यांचे 14 दिवसांनंतरचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे त्यांना बूथ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांचे नंतरचे दोन्ही अहवाल आणि जामखेड येथील कोरोनाबाधित मृत व्यक्तीच्या मुलांच्या संपर्कात आलेल्या दोघांचे अहवालही निगेटिव्ह आल्याने या सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, जामखेड हॉट स्पॉट क्षेत्र असल्याने तेथील दोघांना संस्थात्मक देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. 

यंत्रणेचे कौतुक

नगरच्या बूथ हॉस्पिटलमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पाहून पालकमंत्री हसन मुश्रीफ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख व नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी हॉस्पिटलच्या सर्व डॉक्‍टरांचे, आरोग्य यंत्रणेचे कौतुक केले आहे. लॉकडाउन काळात दाखविलेल्या संयमाबद्दल जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनीही नागरिकांचे आभार मानले. आगामी काळातही सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन या सर्वांनी केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Forecast Maharashtra : मान्सून रेंगाळला ! राज्यातील 'या' भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा, पुण्यातही तापमानात होणार वाढ

Pandharpur Vitthal: अधिक मासात विठुरायाच्या चरणी ९.४६ कोटींचे दान; १४ लाख भाविकांनी घेतलं दर्शन; हुंडी, देणग्या आणि सोने-चांदीचा वर्षाव

Police Constable Death : चंदगड हादरलं! 42 वर्षीय पोलिसानं स्वत:वर गोळी झाडून संपवलं आयुष्य; लष्करात 17 वर्षे बजावलीये सेवा, सध्या मुंबईत होते कार्यरत

Monsoon 2026: पावसाचा वेग मंदावला! अरबी समुद्रातील कोरडे वारे, बंगालचे बाष्प प्रशांत महासागराकडे, हवामानशास्त्रज्ञांनी नेमकी काय सांगितली कारणे?

शिवसेनेत पुन्हा भूकंप! ६ खासदार फुटण्याची भीती, उद्धव ठाकरे गट सक्रिय; अरविंद सावंतांचं लोकसभा अध्यक्षांना पत्र

SCROLL FOR NEXT