Six schools were started in Shrigonda taluka and 146 students attended 
अहिल्यानगर

श्रीगोंदे तालुक्यात भरल्या केवळ सहा शाळा, वर्गात विद्यार्थी फक्त 146

संजय आ. काटे

श्रीगोंदे (अहमदनगर) : कोरोना संकटाच्या पार्श्वभुमिवर सोमवारपासून 9 ते 12 या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरु करण्यात आल्या. तालुक्यात 88 शाळांमधील १६ हजार 121 विद्यार्थी असले तरी प्रत्यक्षात सोमवारी पहिल्यादिवशी केवळ सहा शाळा सुरु झाल्या आणि त्यातही 146 विद्यार्थी हजर राहिले.

दरम्यान अनेक शिक्षकांची कोरोना चाचणीच झालेली नसून ज्यांची चाचणी झाली त्यातील दोन शिक्षकांचा अहवाल कोरोनाबाधित आला. 

तालुक्यात सोमवारपासून शाळा सुरु करण्यासाठी प्रशासन, संस्थाचालक आणि शिक्षकांनी मेहनत घेतली. पंचायत समितीची गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांच्या माहितीनूसार 88 शाळांमधील 9 ते 12 वीच्या वर्गात 16 हजार 121 विद्यार्थी आहेत. त्यांना 680 शिक्षक शिकवितात. शाळा सुरु होण्यापुर्वी या शिक्षकांची कोरोना चाचणी करणे बंधनकारक होते. मात्र प्रत्यक्षात 434 शिक्षकांचीच अशी चाचणी घेतली गेली आणि त्यातीलही 157 शिक्षकांचाच कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाला. यातील एक महिला व एक पुरुष असे दोन शिक्षक कोरोनाबाधित आढळले. 

दरम्यान आज 88 शाळांमधील 16 हजार 121 पैकी निम्मे विद्यार्थी शाळेत येणे अपेक्षीत होते. मात्र प्रत्यक्षात शहरातील श्रीगोंदे माध्यमिक विद्यालय (स्वामी समर्थ) व श्रीगोंदे माध्यमिक विद्यालय (ज्ञानदीप, मरलीधर होनराव विद्यालय, राजीव गांधी विद्यालय चिखलठाणवाडी, पंडीत जवाहरलाल विद्यालय आढळगाव व मिशन गर्ल हायस्कुल श्रीगोंदे हे सहाच विद्यालये सुरु झाली. या विद्यालयात 146 विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. 

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Milk Price Hike: दसरा-दिवाळीआधीच दूध महागणार? तब्बल 8 रुपयांची वाढ! सरकारला 3 दिवसांचा अल्टिमेटम

Nagpur Longest Flyover : गडकरींचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण! इंदोरा ते दिघोरी 8.9 किमीचा प्रवास आता सुसाट; उड्डाणपुलाला मिळणार डॉ. हेडगेवार यांचे नाव, जाणून घ्या नवीन पुलाविषयी...

६ महिन्यांच्या चिमुकल्यावर कुत्र्याचा हल्ला, पिटबुल नव्हे तर American Bully; मालक म्हणाला, उपचारावर ४ लाख खर्च केले

Ajit Agarkar Salary : अजित आगरकरने BCCI कडून किती पगार घेतला? त्याच्या कार्यकाळात भारताची कामगिरी कशी झाली? Report Card

Latest Marathi News Update : सोने दरात आणखी वाढ, सोने दिड लाखांवर

SCROLL FOR NEXT