sarp mitra  esakal
अहिल्यानगर

सापांना जीवनदान देणारे सर्पमित्र अजूनही उपेक्षितच..

सकाळ डिजिटल टीम

मिरजगाव (जि. अहमदनगर) : शेतकऱ्यांचा मित्र म्हणून किंवा त्यांच्या बद्दल असणाऱ्या अंधश्रद्धांमुळे सापांची पूजा केली जाते. मात्र अशाच हजारो सापांना भीती पोटी कोणताही विचार न करता वर्षभर मारले देखील जाते. समाजातील हाच विरोधाभास दूर करण्यासाठी एक वर्ग सातत्याने आपला जीव धोक्यात घालून काम करत असतो. तो वर्ग म्हणजे 'सर्पमित्र'. सापांविषयी समाजात अनेक श्रद्धा अंधश्रद्धा आहेत. समाजातील या श्रध्दा-अंधश्रद्धांच्याबद्दल मार्गदर्शन करून सापांना अभय देणाचे काम अनेक सर्पमित्र करत आहेत. मिरजगाव परिसरात नाग, घोणस, मन्यार विषारी सर्प तर धामण, डुरक्या घोणस, कवड्या, मांजऱ्या, तस्कर, गवत्या, काळडोक्या, हरणटोळ, कुकरी, रुखई, मांडोळ असे अनेक प्रकारचे बिनविषारी सर्प आढळून येतात.

सर्पमित्र नेहमीच दुर्लक्षित

वास्तविक वन्य जीव संवर्धनाची जबाबदारी वन विभागाची असते; परंतु सापांच्या संरक्षणाच्या बाबतीत हा विभाग पूर्णतः उदासीन दिसून येतो. तालुक्यातील सर्पमित्र मात्र प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून हे साप पकडत आहेत. पकडलेल्या सापांना कुठल्याही प्रकारची इजा न होऊन देता त्या सापांना सुरक्षित स्थळी सोडले जाते. मिळेल तो मोबदला घेत सापांच्या प्रति असलेल्या प्रेमपोटी ही मंडळी रात्रंदिवस साप वाचविण्याचे काम करत असतात. वन्य जीव संवर्धनावर करोडो रुपये खर्च करणारे सरकार मात्र या सर्पमित्रांना दुर्लक्षितच ठेवत आहे. अनेक वर्षांपासून मागण्या करून देखील कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही. अनेक सर्पमित्रांना साप पकडण्याचा अधिकृत परवाना दिला जातो, मात्र त्यासाठी लागणारी कुठलेही सुरक्षा साधने पुरविली जात नाहीत. ना कुठला विमा न कुठले मानधन. अशा परिस्थितीत देखील हे सर्पमित्र निस्वार्थी भावनेने सापांना वाचविण्याचे काम करत आहेत.

"अधिकृत सर्पमित्रांचा शासकीय विमा काढला जावा, त्यांच्या कामानुसार त्यांना प्रोत्साहन भत्ता दिला जावा. आमदार रोहित पवार यांनी सर्पमित्रांच्या प्रश्नांकडे लक्ष देऊन ते प्रश्न सोडवावेत." - नारायण घोडके, सर्पमित्र, मिरजगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT