Soft Skill Center of Pune University in Baburdi education ahmednagar sakal
अहिल्यानगर

Education News : बाबुर्डीत पुणे विद्यापीठाचे सॉफ्ट स्किल सेंटर

६५ कोटींची तरतूद, मॅनेजमेंट कौन्सिलचा निर्णय

अशोक निंबाळकर

अहमदनगर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या, नगर तालुक्यातील बाबुर्डी येथील उपकेंद्राच्या इमारतीची उभारणी सुरू आहे. त्याचे काम प्रगतिपथावर असतानाच, विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सिलने नगरसाठी आणखी एक गिफ्ट दिले आहे. याच उपकेंद्राच्या परिसरात सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तब्बल ६५ कोटी रुपयांची तरतूद केल्याचे समजते. ती पूर्णत्वास गेल्यास विद्यार्थ्यांसाठी ही मोठी उपलब्धी ठरेल.

नगर तालुक्यातील बाबुर्डी घुमटच्या ग्रामस्थांनी पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी जमीन दिली आहे. हे तब्बल ८० एकर क्षेत्र आहे. त्या जमिनीवर उपकेंद्राच्या प्रशासकीय इमारतीची उभारणी सुरू आहे. तब्बल तीन कोटी रुपयांची त्यासाठी तरतूद केली आहे. सध्या पहिल्या मजल्याचे काम प्रगतिपथावर आहे. ही तीन मजली इमारत आहे.

तेथे विद्यार्थ्यांसाठी वर्गही उभारले जाणार आहेत. सप्टेंबर २०२२ मध्ये या इमारतीच्या कामाचे भूमिपूजन उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. पहिले दोन महिने तांत्रिक कारणाने या कामास प्रारंभ होत नव्हता. आता मात्र हे काम अखंड सुरू आहे. दर आठवड्याला त्याचा आढावा घेतला जात आहे. उपकेंद्राचे संचालक डॉ. नंदकुमार सोमवंशी या कामास भेट देऊन अहवाल विद्यापीठाला सादर करीत आहेत. १० हजार चौरस फुटांचे हे बांधकाम आहे.

पंधरा प्रकारचे अभ्यासक्रम

विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी १५ प्रकारचे कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. शेती, बँकिंग, ग्रामीण विकास, कार्पोरेट, आरोग्य, कम्युनिकेशन, तसेच मुलींसाठी स्वतंत्र प्रशिक्षण वर्ग घेतले जाणार आहेत. त्यासाठी स्वतंत्र स्टाफ नेमला जाणार आहे. वर्षभर हे अभ्यासक्रम चालविले जातील. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी ही मोठी पर्वणी असणार आहे. उपकेंद्र, तसेच सॉफ्ट स्किल सेंटरमुळे शिक्षणाची विविध दालने खुली होतील.

विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या प्रशासकीय इमारतीचे काम वेगाने सुरू आहे. डिसेंबरअखेर ते पूर्णत्वास जाईल. त्यात अध्यापन कक्ष, प्रयोगशाळाही उभारली जाईल. बाबुर्डी घुमट येथे हे शैक्षणिक दालन आकारास येत आहे.

- डॉ. नंदकुमार सोमवंशी, संचालक, पुणे विद्यापीठ उपकेंद्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

Latest Maharashtra News Updates : हांडेवाडीमध्ये टायर साठ्याच्या शेडला भीषण आग

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

Sangli Girl : धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर दमदाटीने दोघांचे शारिरीक संबंध, आणखी दोघांनी त्याच मुलीवर केला विनयभंग; पोलिस म्हणतात...

SCROLL FOR NEXT