Soldier's killer arrested, crime against three more 
अहिल्यानगर

जवानाचे मारेकरी अटकेत, आणखी तिघांविरूद्ध गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

पारनेर ः जातेगाव येथील माजी जवान मनोज औटी यांच्या खूनप्रकरणी सुपे पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला. सौरव पोटघन, विकी पोटघन, दिनेश पोटघन, अक्षय पोटघन, गणेश पोटघन व संदीप वरकड यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. पोलिसांनी गुरूवारी (ता. 11) रात्री गणेश पोटघन (रा. जातेगाव) व संदीप वरकड (रा. घोसपुरी) यांना ताब्यात घेतले. पारनेर न्यायालयाने त्यांना पाच दिवस (ता. 16पर्यंत) पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. 

घरगुती वादातून वरील आरोपींनी सोमवारी (ता. 8) माजी जवान औटी याला घरातून बोलावून घेतले. घरापासून काही अंतरावर नेऊन केलेल्या मारहाणीत ते बेशुद्ध झाले. त्यानंतर आरोपी तेथून पळून गेले. उपचारादरम्यान तिसऱ्या दिवशी नगर येथील खासगी दवाखान्यात औटी यांचा मृत्यू झाला.

या बाबत पोलिसांनी सुरवातीला तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. नंतर मृत औटी यांच्या नातेवाइकांच्या पुरवणी जबाबावरून आणखी तिघांचा आरोपींमध्ये समावेश केला. दरम्यान, पोलिसांनी आरोपी सौरवचे वडील गणेश पोटघन व संदीप वरकड यांना अटक केली.

पारनेर न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. उर्वरित आरोपींच्या तपासासाठी पथके रवाना झाली आहेत. लवकरच आरोपींना अटक करू, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक अजित पाटील व पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT