The son killed his father 
अहिल्यानगर

मुलगाच बनला बापाचा काळ, मृतदेह फेकला रस्त्यावर

शांताराम काळे

बोटा : किरकोळ कौटुंबिक कलहातून मुलानेच जन्मदात्या बापाला ठार मारल्याची घटना खंदरमाळवाडी (ता. संगमनेर) हद्दीत बुधवारी पहाटे सहाच्या सुमारास घडली. 

भीमा सोमा काळे (वय 50, रा. आंभोरे ता. संगमनेर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी सिताराम भिमा काळे (वय 35 रा. आंभोरे, ता. संगमनेर) याला अटक केली आहे. घारगाव पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार भिमा सोमा काळे हे आंभोरे येथील रहिवासी होते.

दरम्यान, मंगळवारी रात्री घरातील किरकोळ वादाचे रुपांतर बाप-लेकाच्या भांडणात झाले. रात्री उशिरापर्यंत दोघेही घराबाहेर होते. दरम्यान, भीमा काळे यांचा मृतदेह खंदरमाळवाडीच्या हद्दीत पहाटेच्या सुमारास वाटसरुंना दिसला. त्यांनी पोलिस पाटील पुंडलीक साळुंखे व घारगाव पोलीस ठाण्याचे निरिक्षक सुनिल पाटील यांना माहिती दिली.

पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत मुलगा सितारामसह दोघांना ताब्यात घेतले. अखेर मद्यपी सितारामने गुन्हा कबूल केला. त्याच्यासोबत असलेल्या साथीदाराची चौकशी दुपारी उशिरापर्यंत सुरू होती. मृत काळे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

राजू खेडकर, सुरेश टकले, संतोष खैरे, किशोर लाड, हरिश्‍चंद्र बांडे, प्रमोद चव्हाण, गणेश तळपाडे, पोलीस पाटील बाळासाहेब कदम, कुंडलिक साळुंके यांनी याप्रकरणी तपास केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Balochistan Blast : बलुचिस्तानात पाकिस्तानी सुरक्षा दलाच्या ताफ्यावर मोठा हल्ला; २३ जवानांचा मृत्यू , BLAचा हात असल्याचा संशय

राष्ट्रपतींच्या ADCला करता येत नाही लग्न, काय असतात अटी? कशी होते निवड? १ जागा, ३० जण शॉर्टलिस्ट, १४ दिवसांची मॅरेथॉन मुलाखत

Marathi News Live Updates : अरविंद केजरीवाल यांची 'गोवा फॉरवर्ड पार्टी' आणि 'आम आदमी पार्टी' च्या युतीची घोषणा

भांडुपमध्ये पोलिसांची मोठी कारवाई! २० लाखांचा गुटखा पानमसाला जप्त, नऊ आरोपींना अटक; पाच वाहने जप्त

Indian Railway: तिकीट बुक न झालेल्यांसाठी गुडन्यूज! कोकणात 4 अनारक्षित रेल्वे सोडण्याचा निर्णय, मध्य रेल्वेची घोषणा

SCROLL FOR NEXT