Murder  sakal
अहिल्यानगर

मुलाने केला बापाचा खून; कंबरेला दगड बांधून प्रेत विहिरीत फेकले

शांताराम काळे

अकोले (जि. अहमदनगर) : आपल्या जन्मदात्याशी नेहमीच वाद घालणे, त्याला शिवीगाळ करणे, त्याला कुऱ्हाडीने मारणे अशाप्रकारचे हल्ले दृष्टप्रवृत्ती असलेला काळू सतत करत असे. याबद्दल त्याला कारावासाची शिक्षाही झाली होती. मात्र त्याने तो राग मनात साठवून ठेवला आणि सुटून बाहेर आल्यावर अखेर त्याने बापाचा काटा काढलाच.

आई- बहिणीलाही जिवे मारण्याची धमकी

याबाबत राजूर पोलिसांनी सांगितले की, वारूंघुशी येथील बोर वाडी येथे रामदास लक्ष्मण घाणे (वय ६०) हे आपल्या तीन मुले व तीन मुलीसह राहतात त्यांना राजू, बाळू, काळू ही तीन मुले आहेत व तीन मुली आहेत. राजू बाहेर गावी राहतो तर बाळू पुणे जिल्ह्यात आपल्या पत्नीसह रोजगारासाठी जातो व महिना- दोन महिन्यांनी घरी येत असतो. काळू हा घरीच असतो. शनिवारी बकऱ्या विक्री वरून बाप लेकात भांडणे झाली. त्यातच काळूने आपल्या बापाचा खून केला. काळू घाणे याने (रामदास घाणे) बापाचा खून करून २५ किलोचे दोन दगड कंबरेला बांधून विहिरीत टाकून दिले व घरातील आई आणि बहिणीला ''तुम्ही कुणाला सांगाल तर तुमचाही काटा काढेल'' असा सज्जड दम दिला. मात्र मंगळवारी त्याचा भाऊ बाळू घाणे घरी आला आणि त्याने आईला म्हतारा कुठे विचारले. असे विचारताच आई रडू लागली अन् त्याच वेळी काळू घरातून पळून गेला. ही घटना राजुला कळताच तोही पळत आला.

गुरुवारी सकाळी दोघा भावांनी विहिरीत असलेले आपल्या बापाचे प्रेत वर काढले. त्यावेळी स.पो. नि. नरेंद्र साबळे सहाय्यक नितीन खैरनार, हेड कॉन्स्टेबल डगळे, काळे उपस्थित होते. पंचनामा करून मृतदेह राजूर ग्रामीण रुग्णालयात आणून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. राजूर पोलिसांनी खुनाचा भा. द. वि. ३०२ गुन्हा दाखल करून फरार झालेल्या आरोपीस पकडण्यासाठी पथक पाठवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPSC परीक्षेत AI ची एंट्री! 569 उमेदवारांचे अर्ज थेट फेटाळले, कारण वाचून धक्का बसेल... पूजा खेडकर प्रकरणानंतर मोठा निर्णय

Cotton Sowing Delay : कापसाला मिळणार 8,600 रुपये हमीभाव; यंदा 20 टक्के उत्पादन घटण्याची शक्यता, शेतकऱ्यांचे भवितव्य पावसावर अवलंबून

Sindhudurg Mystery: कणकवलीत रहस्यमय घटना! ना भूकंप, ना स्फोट; फोंडाघाट परिसरातील अचानक घरांच्या भिंतींना तडे, घटनेचे गूढ

Ladki Bahin Yojana Scam : लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेतलेल्या लाभार्थ्यांकडून सरकार वसूल करणार रक्कम; जिल्हाधिकाऱ्यांना कडक निर्देश

Latest Marathi News Live Update : महायुतीतील २१८ मतांची गूढ फूट; पराभवानंतर भाजपकडून चौकशीचे आदेश

SCROLL FOR NEXT