In Sonai Gram Panchayat, Water Conservation Minister Shankarrao Gadakh has achieved great success by winning 16 out of 17 seats.
In Sonai Gram Panchayat, Water Conservation Minister Shankarrao Gadakh has achieved great success by winning 16 out of 17 seats. 
अहमदनगर

Gram Panchayat Results : नेवासे तालुक्यात आजी-माजी आमदारांनी गड राखले; मंत्री गडाख यांचा धुमधडाका

विनायक दरंदले

सोनई (अहमदनगर) : जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी सोनई, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी देवगाव तर माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी आप-आपल्या गावाचा गड राखला आहे. नेवासे तालुक्यातील सर्व ५२ ग्रामपंचायतीचे निकालसमोर आले असून मंत्री गडाख यांचे अनेक ग्रामपंचायतीवर प्रभुत्व सिध्द झाले आहे. माजी खासदार तुकाराम गडाख यांच्या सहभागाने रंगत भरलेल्या सोनई ग्रामपंचायतीमध्ये मंत्री गडाखांनी १७ पैकी १६ जागा जिंकत मोठे यश प्राप्त केले आहे.

माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी आपल्या देवगावात १३ पैकी ११ जागा जिंकल्या. त्यांच्या गटाचे नेतृत्व पंचायत समिती सदस्य अजित मुरकुटे यांनी केले. येथे मंत्री गडाख गटास दोन जागा मिळाल्या. माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी कुकाणे येथे सत्ताधारी गटाला दे-धक्का देत आठ जागा जिंकल्या. येथे अॅड देसाई देशमुख गटाला सहा तर एक अपक्ष निवडून आला आहे. 

तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत निवडणुकीत मंत्री गडाख गटाने वर्चस्व प्रस्थापित केले. अनेक गावात त्यांच्याच दोन गटात लढत झाली. निकालानंतर आता सरपंच पदाच्या आरक्षणाकडे ग्रामस्थांच्या नजरा लागल्या आहेत. कोणत्या गटाचे कारभारी जादा होणार याविषयी सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'7 दिवस पत्नी अन् 7 दिवस प्रेयसीसोबत राहतो'; कराराच्या आधारे कोर्टाने केली आरोपीची सुटका

Sanju Samson Fined : अंपायरशी वाद घालणे आले अंगलट... BCCI ची संजू सॅमसनवर मोठी कारवाई; काय आहे संपूर्ण प्रकरण

Kolhapur Lok Sabha : मुश्रीफांच्या सांगण्यावरून कारवाई करत असाल तर मीही छत्रपतीये, याद राखा; संभाजीराजेंचा कोणाला इशारा?

Latest Marathi News Live Update : अमित शहा यांची आज जालन्यात सभा

Share Market Opening: गुंतवणूकदार चिंतेत! शेअर बाजारात पुन्हा घसरण; 'या' शेअर्सचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT