Sonai police vigilance averts the looting of two thousand boxes worth Rs 40 lakh.jpg 
अहिल्यानगर

बियरच्या गाडीला पोलिसांचा रात्रभर खडा पहारा

विनायक दरंदले

सोनई (अहमदनगर) : नगर-औरंगाबाद रस्त्यावरील घोडेगाव (ता.नेवासे) येथील शनिचौकात बीयर बाॅक्स घेवून चाललेला कंटेनर एम.एच.२६ ए.डी.७६४२ चा अपघात होवून रस्ता दुभाजकावर पलटी झाला. सोनई पोलिसांच्या सतर्कतेने चाळीस लाख रुपयाच्या दोन हजार बाॅक्सची लुटमार टळली.

औरंगाबाद जवळील वाळुंज औद्योगिक वसाहत मधून टुबर्ग कंपनीचे दोन हजार बीयरचे बाॅक्स घेवून कोल्हापूरला भरधाव वेगात चालला होता. समोर ऊस वाहतुकीचा ट्रॅक्टर पलटी झालेला दिसल्यानंतर जोरात ब्रेक मारल्यानंतर कंटेनर रस्ता दुभाजकावर आदळून पलटी झाला. हा अपघात मंगळवारी रात्री साडेबारा वाजता झाला.
   
कंटेनर पलटी होवून अंदाजे चाळीस लाख रुपये किंमतीचे दोन हजार बीयर बाॅक्स विखुरले होते. रात्रीच्या गस्तीवर असलेले सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात काही वेळात अपघाताच्या ठिकाणी पोचले. मालमत्तेची लुटमार होण्याची शक्यता लक्षात घेवून त्यांनी हवालदार रविंद्र लबडे व होमगार्डचा बंदोबस्त ठेवला. रात्री उशिरा सर्व बीयरचे बाॅक्स बदली वाहनातून हलविण्यात आले. कंटेनर मालकाकडून मोठे अर्थपूर्ण बक्षीस घेतल्याची ग्रामस्थांत चर्चा रंगली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT