पेरणी 
अहिल्यानगर

देवाक काळजी रे! मृगाने हसवले, आद्राने फसवले

नीलेश दिवटे

कर्जत : मृगाने हसविले अन आद्राने फसविले' अशी तालुक्यात परिस्थिती झाली आहे. खरिपात दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. कोरोनामुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांच्या पोटात पुढे काय होणार या भीतीचा गोळा उभा राहिला आहे. पाऊस न आल्यास पेरणी केलेली पिके वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना देवाक काळजी रे अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे मृग नक्षत्रात पेरणीयोग्य पाऊस झाला. त्यामुळे तालुक्यात तूर, उडीद, मूग, बाजरी, सोयाबीन आदी पिकांची मोठ्या प्रमाणावर पेरणी करण्यात आली. मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पाऊस झाल्याने शेतकरीवर्ग खुशीत होता. मात्र, पेरणीनंतर पावसाने दडी मारली असून मृगानंतर येणाऱ्या आद्रा नक्षत्रात पाऊस न पडल्याने शेतकरीवर्गासमोर संकट उभे राहिले आहे.(Sowing is likely to be wasted due to lack of rains)

पावसाअभावी कोवळ्या पिकांनी माना टाकल्या आहेत. पिके करपून चालली आहेत. बऱ्याच वर्षानंतर यंदा वेळेवर मृग नक्षत्र बरसल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आनंदाने पेरण्या उरकून घेतल्या. घरात पैसा नसतानाही उसनवारी, कर्जबाजारी होत बी बियाणे खरेदी केले. मृग नक्षत्रातनंतर येणाऱ्या आद्रा नक्षत्रात पावसाने दडी मारल्याने पिके सुकून चालली आहेत. तर काही ठिकाणी पिके करपून गेली आहेत. येत्या काही दिवसांत जर पाऊस आला नाही तर पीक हातची जाणार आहेत. कोरोनानंतर शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.

पेरणी योग्य ओल (वाफसा) झाल्याशिवाय पेरणी करायला नको होती. मात्र, शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. पिकातील आंतरमशागत करावी तसेच पाण्यात विरघळणारी संयुक्त खतांची फवारणी करावी. या मुळे ओल राहून पीके काही दिवस तग धरतील. तसेच ज्यांची पेरणी राहिली असेल ती त्यानी आवश्यक पाऊस झाल्यावरच करावी.

-दीपक सुपेकर, तालुका कृषी अधिकारी,कर्जत.

तालुक्यातील एकूण पिकांची मंडलनिहाय पेरणी आकडेवारी (हेकटरमध्ये) ः

१) तृणधान्य पीके

मंडल - बाजरी- मका

भांबोरा - ९५६ - ३८५

माही - २२६ - १५०

राशीन - २९७ - १६९

मिरजगाव - ४३७ - २२२

कोंभळी - १६९७ - ५५२

कर्जत - ५२८ - २७०

कडधान्य पिके

मंडल - तूर - मूग - उडीद

भांबोरा - ७०५- २९३- १३६७

माही - ५३९- १६९- १०६४१

राशीन - ६७- १६६- २५०

मिरजगाव - १६६८ - १३७ - १७२९

कोंभळी - १४९७ - २६६ - २०९५

कर्जत - ४३१ - २१० - ९४५०.

तेलबिया पिके

मंडल - भुईमूग - सूर्यफूल

भांबोरा - ५८ - १२

माही - १० - ००

राशीन - ४ - ००

मिरजगाव - २२ - ००

कोंभळी - ४२ - ००

कर्जत - ५१ - ०० (Sowing is likely to be wasted due to lack of rains)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishwas Patil: मराठी साहित्याचा ऱ्हास थांबवा: अध्यक्ष विश्वास पाटील; अन्यथा खूप वाईट दिवस नेमकं काय म्हणाले?

Yearly Numerology 2026: मूलांक 1 आणि 5 साठी 2026 ठरणार शुभ; राहील सूर्याची विशेष कृपा, वाचा अंकज्योतिषनुसार तुमचे वार्षिक राशिभविष्य

आजचे राशिभविष्य - 01 जानेवारी 2026

Morning Breakfast Recipe: नवीन वर्षाची हेल्दी सुरुवात! पहिल्याच दिवशी नाश्त्यात बनवा पौष्टिक पराठा, रेसिपी आहे खूपच सोपी

ढिंग टांग - नवे संकल्प : एक (नुसतेच) चिंतन..!

SCROLL FOR NEXT