gramsabha esakal
अहिल्यानगर

Ahmednagar | जिल्हाभरात १६ नोव्हेंबरला विशेष ग्रामसभा

Ahmednagar | जिल्हाभरात १६ नोव्हेंबरला विशेष ग्रामसभा; नवमतदारांची नावनोंदणी

सकाळ वृत्त सेवा

अहमदनगर : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दर वर्षी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदारयादी पडताळणी व दुरुस्ती करण्याचा, एक जानेवारीस नवीन मतदार नावनोंदणी करून ती सुधारित करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येतो. या कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी १६ नोव्हेंबरला प्रत्येक गावात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याचे निर्देश राज्याच्या ग्रामविकास विभागाने दिले आहेत.

नवमतदारांची नावनोंदणी

पुनरीक्षण कार्यक्रमात एक जानेवारी २०२२ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांची नोंदणी करून मतदारयादी सुधारित करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीत मतदारयादी ग्रामस्थांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ग्रामसभेत या यादीचे वाचन करण्यात येणार आहे. मतदारयादीतील नोंदींबाबत हरकती असल्यास त्यावर हरकती घेता येणार आहेत. नावात दुरुस्ती, नाव समाविष्ट करणे, नाव वगळण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज यावेळी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

अशी करावी नावनोंदणी

ग्रामसेवक किंवा संबंधित गावातील मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (बीएलओ), ग्रामस्थांना अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांना तलाठी सहकार्य करतील. नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या हरकती, दुरुस्ती अथवा नावनोंदणी अर्ज जमा करून ते पुढील कार्यवाहीसाठी मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहेत. nvsp portal/voter helpline App या वेबसाइटवर ऑनलाइन नावनोंदणी कशी करावी, याची माहिती यावेळी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी देतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: मध्य रेल्वेवर १५ दिवस पॉवरब्लॉक, अनेक लोकलवर परिणाम; वेळापत्रकात मोठे बदल

Nepal Flood Update : नेपाळच्या पुरात महाराष्ट्रातील पर्यटक अडकले, राज्य सरकारचे प्रयत्न सुरू, 4 जण सुरक्षित; मंत्री शंभूराज देसाईंनी दिली महत्त्वाची अपडेट

Sunetra Pawar: चिमुकलीवरील अत्याचार-हत्या प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार आक्रमक; आरोपीला फाशीची शिक्षा मिळवून देण्याची ग्वाही

Marathi News Live Updates : ठाण्यात क्लस्टर योजनेविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

SCROLL FOR NEXT