Sport equipment sakal
अहिल्यानगर

कर्जत-जामखेडमधील १९ शाळांना क्रीडासाहित्य

आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांमुळे सुविधा; खेळाडूंच्या गुणवत्तेत होणार वाढ

वसंत सानप

जामखेड : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे विविध प्रकारच्या खेळांतील नैपुण्य विकसित व्हावे, याकरिता कर्जत-जामखेड तालुक्यांतील एकोणीस शाळांना चाळीस प्रकारच्या खेळांचे साहित्य आमदार रोहित पवार यांनी मिळवून दिले. अशा प्रकारे लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराने खेळाच्या साहित्याची उपलब्ध होणारी ही कर्जत-जामखेडमधील पहिलीच घटना आहे. या निर्णयाचे दोन्ही तालुक्यांतील क्रीडाप्रेमी व खेळाडूंकडून स्वागत होत आहे.

आमदार रोहित पवार यांनी दोन्ही तालुक्यांतील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत. या शाळांतील शैक्षणिक वातावरण चांगले राहावे, याकरिता निरनिराळे उपक्रम राबविले. त्यातच क्रीडा क्षेत्रातही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडून चमकदार कामगिरी व्हावी, याकरिताही लक्ष केंद्रित केले.

याकरिता शालेय स्तरावर क्रीडाशिक्षकांच्या माध्यमातून खेळाडू घडविण्याचे प्रयत्न सुरू असतात. मात्र, त्यांना विविध प्रकारच्या खेळांच्या सरावासाठी लागणाऱ्या साहित्याची उपलब्धी, ही सर्वांत मोठी अडचण असते. त्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांची अनेकदा कुचंबणा होते, हे आमदार रोहित पवार यांनी हेरले अन् त्यांनी दोन्ही तालुक्यांतील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांना खेळाच्या साहित्याचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. याकरिता सर्वतोपरी मदतीची तयारी दर्शविली.पहिल्या टप्प्यात दोन्ही तालुक्यांतील एकोणीस शाळांना, तर पुढील काळात टप्प्याटप्प्याने उर्वरित शाळांना साहित्याचा पुरवठा करून, ग्रामीण भागातूनही चांगले खेळाडू घडावेत, यासाठी आमदार रोहित पवारांचा प्रयत्न आहे.

ग्रामीण भागात राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करणारे खेळाडू घडावेत, याकरिता शाळेत प्रशिक्षणाचे धडे मिळण्याकरिता सरावासाठी लागणाऱ्या साहित्याची उपलब्धी असावी, म्हणून अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत कर्जत तालुक्यातील चौदा व जामखेडमधील पाच मिळून १९ शाळांना प्रत्येकी तीन लाखांचे खेळाचे साहित्य देण्यात आले. यामध्ये रयतच्या शाळांचाही समावेश आहे. संबंधित साहित्य जिल्हा क्रीडा योजनेंतर्गत दिले आहे.

- आमदार रोहित पवार, कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT