Dissatisfaction of employees transfer process State Transport Corporation ahmednagar sakal
अहिल्यानगर

राज्य परिवहन महामंडळातील बदली प्रक्रिया प्रकरणी कर्मचाऱ्यांची नाराजी

बदलीप्रक्रिया नेहमीच पारदर्शक व नियमाला धरून होत असते. बदली होण्याच्या अगोदर कोणाला कोणत्या ठिकाणी नियुक्ती मिळणार, हे कोणत्याच विभागात स्पष्ट होत नाही

दौलत झावरे

अहमदनगर : बदलीप्रक्रिया नेहमीच पारदर्शक व नियमाला धरून होत असते. बदली होण्याच्या अगोदर कोणाला कोणत्या ठिकाणी नियुक्ती मिळणार, हे कोणत्याच विभागात स्पष्ट होत नाही; परंतु सध्या एसटी महामंडळाच्या अहमदनगर विभागात कोणता अधिकारी बदलून येणार आहे, याबाबत चर्चेला उधाण आलेले आहे. या चर्चेमुळे सध्या कर्मचाऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या अहमदनगर विभागात विभागीय भांडार अधिकारी, विभागीय वाहतूक अधिकारी यांसह सहा ते सात पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांचा पदभार इतरांकडे देऊन सध्या दैनंदिन कामकाज केले जात आहे. कमी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बळावर गेल्या अनेक दिवसांपासून अहमदनगर विभागाचे कामकाज सुरळीत सुरू आहे. कोरोना काळात एसटी तोट्यात गेलेली आहे. त्यानंतर एसटीचे चाक रुळावर येत असतानाच कर्मचाऱ्यांचा संप सुरू झालेला आहे. या संपामुळे एसटीचे मोठे नुकसान झालेले आहे. संप मिटवावा व कर्मचाऱ्यांनी कामावर यावे, यासाठी राज्य सरकारसह एसटी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र काही जण, आपल्याला अहमदनगर जिल्ह्यात नियुक्ती मिळणार आहे, अशी चर्चा अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये भेटून घडवून आणत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

ही आहेत रिक्त पदे

  • यंत्र अभियंता (चालन)

  • विभागीय भांडार अधिकारी (नगर)

  • विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी

  • विभागीय वाहतूक अधिकारी

  • विभागीय वाहतूक अधीक्षक

  • संगमनेर, तारकपूर, पाथर्डी आगार व्यवस्थापन

अधिकारी व कर्मचाऱ्यांची सोय पाहण्यापेक्षा एसटीचे हित पाहणे गरजेचे आहे. सध्या काही अधिकारी नगरला येऊन, आपण येथे येणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. ही चर्चा सध्याच्या एसटीच्या हिताची नसून, त्याविषयी कर्मचाऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

- रणजित श्रीगोड, जिल्हाध्यक्ष, प्रवासी संघटना

राज्य परिवहन महामंडळातील बदल्यांची प्रक्रिया सेवाज्येष्ठतेनुसार होत आहे.

- ज्ञानदेव अकोलकर, विभागीय सचिव, एसटी कामगार संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Imran Khan Death Claim : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू ? पत्रकाराच्या दाव्याने खळबळ

मला आजही महागड्याच.... मोहसीनने दुसऱ्या पत्नीसोबत फोटो शेअर करताच उर्मिला मातोंडकरने मारला टोमणा; पोस्ट करत म्हणाली

Tata Sons N Chandrasekaran : टाटा समूहाला मोठा धक्का? चंद्रशेखरन यांच्या राजीनाम्याच्या बातमीने शेअर्स गडगडले, TCS मध्ये मोठी घसरण

Sri Lanka squad for 1st Test vs India: विजय आपलाच... भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून श्रीलंकेच्या दोन स्टार खेळाडूंची माघार; १५ सदस्यीय संघ जाहीर

हातात पिशव्या, पायात चप्पलही नाही... लोकप्रिय अभिनेत्याची पत्नी चक्क कंडक्टरसोबत पळाली; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

SCROLL FOR NEXT