The state government has no intention of planting orchards 
अहिल्यानगर

राज्य सरकारकडून फळबाग लागवडीचे उद्दिष्टच नाही, सूक्ष्मसिंचनाचे प्रस्तावही घेईनात

वसंत सानप

जामखेड : राज्य शासनाच्या माध्यमातून बहुभुधारक शेतकऱ्यांकरिता राबविण्यात येणाऱ्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट आले नाही. त्यामुळे सदर योजने अंतर्गत फळबाग लागवड करणाऱ्या व लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या आडचणीत वाढ झाली आहे. त्यांची प्रतीक्षा शिगेला पोहचली आहे. तसेच गेली पाच महिन्यापासून अॉनलाईन सूक्ष्म सिंचनचे प्रस्ताव स्वीकारले जात नाहीत. यामध्ये आमदार रोहित पवारांनी लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी होते आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी, दरवर्षी जून महिन्यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा शुभारंभ होतो. सुक्ष्मसिंचन योजनेंतर्गत समाविष्ट असलेल्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव अॉनलाईन दाखल करून घेतले जातात. यावर्षी मात्र  तब्बल पाच महिन्यांपासून शेतकरी या दोन्ही योजनेची वाट पहाताहेत. मात्र, योजनेचे उद्दिष्ट आलेले नसल्याने शुभारंभ काही होऊ शकलेला नाही.

दरवर्षी जामखेड तालुक्यात भाऊसाहेब फुंडकर फळभाग लागवड योजनेंतर्गत आंबा, लिंबू, डाळिंब, संत्रा व इतर फळबागांची लागवड मोठ्या प्रमाणात झाली. प्राप्त उद्दिष्टाहून अधिक क्षेत्र लागवडी खाली आले. मात्र, यायार्षी  ही योजना लालफितीच्या निर्णयामुळे आडगळीत पडली आणि शेतकऱ्यांची मोठी आडचण झाली आहे. सदर योजने अंतर्गत यार्षी फळबाग लागवड करायची म्हणून खरीपाची पेर केली नाही आणि आता रब्बी ची ही पेर केली नाही आणि फळबाग लागवड ही करता आली नाही अशा आडचणीत काही शेतकरी सापडले आहेत.

आता तर प्रतीक्षा करता करता हंगाम संपत आलाय नोव्हेंबर उजडलाय पण योजनेचे उद्दिष्ट आलेले नाही. त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांचे प्रस्ताव दाखल करून घेतलेले नाहीत. ही आडचण सोडवण्यासाठी आमदार रोहित पवारांनी प्रयत्न करावेत, आणि दरवर्षी पेक्षा अधिकचे उद्दिष्ट आंबा,संत्रा ,लिंबू ,सिताफळ, पेरु या इतर सर्व प्रकारच्या फळबागांसाठी मंजूर करून घ्यावे,अशी मागणी शेतकऱ्यांमधून होते आहे.

या संदर्भात क्रषी विभागाशी संपर्क साधला असता तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे यांनी सांगितले भाऊसाहेब फुंडकर कृषी योजने अंतर्गत  तालुक्यासाठी 'उद्दिष्ट 'आलेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Double Decker Bus: पुणेकरांची स्वप्नपूर्ती! 'मनपा'च्या ताफ्यात डेकर बस; 'या' मार्गांवर धावणार

Kannad News : चिकलठाणच्या गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Dashavatar: दशावतार चित्रपटात दाखवलेला तो 'राखणदार' कोकणात खरंच असतो का? काय आहे परंपरा?

Crime News : सिन्नरमधील वायर चोरी प्रकरणी दोघांना अटक; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Updates : करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन उद्या दिवसभर बंद राहणार

SCROLL FOR NEXT