state government should pay attention milk issue demand from producers Shrirampur ahmednagar Sakal
अहिल्यानगर

Ahmednagar News : दूधप्रश्‍नी राज्य सरकारने लक्ष घालावे; श्रीरामपूर, उंदिरगावातील उत्पादकांची मागणी

निवेदनात म्हटले की, ठाकरे सरकारच्या काळात दुधाला ३६ ते ४० रुपये दर होते. शिंदे सरकारच्या काळात हे दर २० ते २४ रुपये इतक्या निच्चांकी पातळीवर आले.

सकाळ वृत्तसेवा

श्रीरामपूर : दूध प्रश्‍नी राज्य शासनाने तत्काळ लक्ष घालावे, अशी मागणी करत तालुक्यातील उंदिरगावातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी तहसीलदार मिलिंद वाघ व शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांना निवेदन दिले. २५ जूनला हरेगाव फाटा येथे बेमुदत ‘रास्ता रोको’चा इशाराही दिला आहे.

निवेदनात म्हटले की, ठाकरे सरकारच्या काळात दुधाला ३६ ते ४० रुपये दर होते. शिंदे सरकारच्या काळात हे दर २० ते २४ रुपये इतक्या निच्चांकी पातळीवर आले. राज्यात पडलेल्या दरामुळे शेतकरी आत्महत्या वाढ झाली हे सरकारचे पाप आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांना खोट्या अनुदानाची बोळवण व दिशाभूल न करता ३८ ते ४० रुपये दर असताना भाव पाडल्याने १५ ते १८ रुपये प्रति लिटर तफावत निर्माण झाली.

त्या फरकासह किमान ४० रुपये प्रति लिटर दुधाला दर मिळावा. अथवा कमी झालेल्या दरामुळे निर्माण झालेल्या फरकाची रक्कम देता येत नसल्यास ४० रुपये अधिक १५ रुपये, असे ५५ रुपये प्रति लिटर गाईच्या दुधाला भाव मिळावा, अशी मागणी केली.

जानेवारीमध्ये दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे यांनी ३० टक्के राज्यात भेसळयुक्त दूध असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे शहरी ग्राहकांकडून पॅकिंगयुक्त दूध वापरण्यास नापसंती दर्शवली जात आहे. वास्तविक राज्य शासनाने व दुग्ध मंत्रालयाने भेसळ करणाऱ्या चिलिंग प्लांटवर कारवाया करून तयार होणारे भेसळयुक्त दूध थांबवणे गरजेचे होते.

दुधाचे दर कमी झाल्यानंतर खाद्य, जनावरांची औषधे, चाऱ्याचे भावात वाढ होत गेली. निवेदनावर शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष व दूध उत्पादक अनिल औताडे, शेतकरी संघटनेचे साहेबराव चोरमल, प्रकाश ताके, बाळासाहेब घोडे, अनिल रोकडे, सागर गिऱ्हे, प्रमोद भालदंड, अनिल भालदंड यांसह अनेक दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

श्रीरामपूर केंद्रबिंदू

तालुक्यातील ११ जूनपासून प्रत्येक गावातील शेतकरी अशा प्रकारचे निवेदन देऊन २४ जूनच्या मोर्चासाठी हजारो शेतकरी येणार आहेत. राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा केंद्रबिंदू श्रीरामपूर असणार आहे. सरकारने दूध उत्पादकांचा अंत पाहू नये, दूध उत्पादकांचे आंदोलन सरकारला व सरकारमधील मंत्र्यांना न परवडणारे असेल, असा इशाराही दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दिल्याचे औताडे यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराऐवजी हवनाकडे वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: विरार - दादर लोकल ट्रेनमध्ये माथेफिरूचा धुमाकूळ; रेल्वे प्रवासी महिलांची सुरक्षा वाऱ्यावर

SCROLL FOR NEXT