bolhegoan road 
अहिल्यानगर

निंबळक बाह्यवळण ते बोल्हेगाव रस्त्याची  राज्य शासनाच्या पथकाने केली पाहणी 

अमित आवारी

नगर : शहरातील सावेडीगावातील बालिकाश्रम रस्त्यापासून सुरू होणाऱ्या बोल्हेगाव ते निंबळक बाह्यवळण रस्त्याच्या कामासाठी आमदार संग्राम जगताप यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. त्यामुळे मुख्यमंत्री ग्राम सडक अभियानातून तपोवन व बोल्हेगाव ते निंबळक बाह्यवळण रस्त्यासाठी निधी आला. हा रस्ता निकृष्ट असल्याबाबत आमदार जगताप यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना सांगितले होते. त्यानुसार आज महाराष्ट्र ग्रामीण विकास संस्थेच्या पथकाने या रस्त्याची पाहणी केली. नगरसेवक कुमार वाकळे यांनी पथकाला रस्त्याची दुरवस्ता दाखविली. 

बोल्हेगाव ते निंबळक बाह्यवळण रस्त्याचे कामही तपोवन रस्त्याच्या बरोबरीने झाले होते. सावेडी उपनगर, बोल्हेगाव व नागापूर परिसराचा विकास व्हावा यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक नगरसेवकांनी आमदार जगताप यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार आमदार जगताप यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा करत हा रस्ता व तपोवन रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक अभियानातून निधी आणला होता.

या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदारामार्फत रस्त्याचे काम पूर्ण केले. मात्र पहिल्याच पावसात हा रस्ता खराब झाल्याचे स्थानिक नगरसेवक व आमदार संग्राम जगताप यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे आमदार जगताप यांनी पालकमंत्र्यांकडे या रस्त्याच्या कामाची चौकशी करण्याची तसेच हा रस्ता पुन्हा नव्याने करून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील महाराष्ट्र ग्रामीण विकास संस्थेचे तीन सदस्यीय पथक काल (मंगळवारी) शहरात दाखल झाले. यात वरिष्ठ राज्य गुणवत्ता निरीक्षक एस.ए. चौधरी यांच्यासह एच.आर. रंधीर व ए.डी. पेशवे यांचा समावेश आहे. 

या पथकाने काल तपोवन रस्त्याची पाहणी केली. आज या पथकाने बोल्हेगाव ते निंबळक बाह्यवळण रस्त्याची पाहणी केली. या पथकाला नगरसेवक कुमार वाकळे यांनी रस्त्याची दुरवस्ता दाखवून दिली. या रस्त्यावरील डांबराचे काही नमुने पथकाने घेतले. तसेच खड्डे बुजविण्याचे व या रस्त्याचे दर्जेदार काम होईपर्यंत ठेकेदाराची बिले अदा करून नयेत असे आदेश या पथकाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! आता प्रत्येक शिक्षकाचे स्वतंत्र प्रोफाईल तयार होणार; माध्यमिक शिक्षण विभागाचा निर्णय; एका क्लिकवर मिळणार ३ लाख शिक्षकांचा बायोडाटा

Panchang 24 March 2026: आजच्या दिवशी ऋणमोचक मंगळ स्तोत्राचे पठण आणि ‘अं अंगारकाय नमः’ या मंत्राचा जप करावा

आजचे राशिभविष्य - 24 मार्च 2026

Pune News: औषधोपचाराने ‘एमडीआर’ क्षयरोगावर मात; मृत्युदर घट, बरे होण्याचे प्रमाण वाढले

इनर इंजिनिअरिंग : आपल्यातील सर्वोच्च शक्ती

SCROLL FOR NEXT