Story that tells the history of the Nagar district being at the forefront of the freedom movement 
अहिल्यानगर

सैन्य भरतीवेळी नगर जिल्ह्यात मामलेदाराला घर पेटवून मारले होते

अशोक मुरुमकर

अहमदनगर : काना, मात्रा, वेलांटी, उकार असं काहीच नसलेल्या सात शब्दांपासून बनलेला अहमदनगर जिल्हा सुरुवातीपासूनच चर्चेत राहिलेला आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी जगप्रसिद्ध असलेला ‘डिस्कव्हरी ऑफ इंडीया’ हा ग्रंथ याच जिल्ह्यातील भुईकोट किल्ल्यात लिहीला. या जिल्ह्यात एका बाजूला दुष्काळ तर दुसऱ्या बाजूला कोकणात आल्यासारखे वाटते.

हा जिल्हा कायम या ना त्या कारणाने चर्चेत असतो. स्वातंत्र्य चळवळीत हा जिल्हा आघाडीवर होता. याच्या नोंदी नगरचा इतिहास सांगण्या पुस्तकांमध्ये आहेत. सैन्यभरतीवेळी येथे मोठा उठाव झाला होता, यामध्ये नागरिकांनी कसा सहभाग घेतला होता, हेही पुस्तकांत सांगितले आहे. 

महात्मा गांधींच्या असहकार कायदेभंग चळवळीत अनेक सत्याग्रहींनी सहभाग घेतला होता. १९४२ मध्ये ‘भारत छोडो’ चळवळीत काँग्रेसने गुप्त आणि उघड प्रतिकार सुरु केला. यावेळी गुप्त चळवळीचे नेतृत्व अच्युतराव पटवर्धन करत होते. तेव्हा भाऊसाहेब कुकडे यांनी आपल्या प्रेसचे रूपांतर गुप्तपणे बुलेटीन छापण्यासाठी केले होते. 25 डिसेँबर 1941 ला सरोज सिनेमागृहात हबीबखान आणि सलाम यांनी बॉम्ब टाकला होता. तेव्हा सरोश बाँब खटला महाराष्ट्रात गाजला होता.

रावसाहेब पटवर्धन, बापूसाहेब भापकर, दत्तात्रय देशमुख, कॉम्रेड कडू पाटील, चंद्रभान आठरे, अण्णासाहेब शिंदे, रावसाहेब शिंदे, हुसेन भाई, बाबुराव तनपुरे, भाऊसाहेब थोरात आदींनी स्वातंत्र्य चळवळीत मोठ्या प्रमाणात भाग घेतला होता. नगर जिल्ह्याचा हैदराबाद मुक्तिसंग्राम व गोवा मुक्ती लढ्यातही सहभाग होता.

मराठी राज्याचे सेनापती त्र्यंबकची इंगळे यांनी इंग्रज सत्तेविरुद्ध लढा दिला. १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यात अकोले या डोंगराळ भागातील आदिवासी समाजाने इंग्रजांविरुद्ध झुंज दिली. पहिल्या महायुद्धातील सक्तीची सैन्यभरतीच्या विरोधात अकोले तालुक्‍यात मोठा उठाव झाला होता. त्यामध्ये मामलेदाराला घर पेटवून मारले होते. त्यात एकाला फाशी व 17 जणांना जन्मठेप झाली होती, याच्या नोंदी नगरचा इतिहास सांगणाऱ्या अनेक पुस्तकांमध्ये आहेत.

अहमदनगर जिल्ह्याचा व शहराचा स्वातंत्र्य चळवळीत मोलाचा सहभाग होता. 1942 च्या आंदोलनात पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, मौलाना आझाद, पंडित गोविंद, वल्लभपंत, डॉ. पट्टाभिसितारमय्या आदींना नगरच्या भुईकोट किल्ल्यात बंदिवासात ठेवण्यात आले होते.

अहमदनगर जिल्ह्याची स्थापना प्रशासकीय दृष्ट्या १८६० मध्ये झाली आहे. गोदावरी व भीमा नदीकाठी हा जिल्हा वसलेला आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा जिल्हा महाराष्ट्रात क्रमांक एकचा आहे.  या जिल्ह्यात जामखेड, कर्जत, श्रीगोंदा, राहुरी, अकोले, संगमनेर, पाथर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासे, शेवगाव, नगर हे तालुके आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचं 'Arrest Warrant' घेवून नाशिक पोलिस मुंबईतील लीलावती रूग्णालयात दाखल!

Doctors Prescription: आता डॉक्टरांना स्पष्ट प्रिस्क्रिप्शन लिहिणे बंधनकारक! एनएमसीचा कठोर आदेश; निर्णयामागचं कारण काय?

IPL 2026: 'बाकी फ्रँचायझी झोपल्या असताना मुंबई इंडियन्सने संधी साधली' R Ashwin ला नेमकं काय म्हणतोय?

Maharashtra Cabinet Reshuffle : राज्य मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला वेग; वसमतचे आमदार राजू नवघरे मंत्री होण्याची दाट शक्यता!

Bhimashankar History : ८० वर्षांनंतर भीमाशंकरची सावली पुन्हा; जुन्नर–आंबेगावात नरभक्षक बिबट्यांची दहशत!

SCROLL FOR NEXT