2lockdown ई सकाळ
अहिल्यानगर

ढील दिली, महागात पडली! पुन्हा नगर शहरात कडक लॉकडाउन

आयुक्तांनी आदेश घेतला एका दिवसात मागे

अमित आवारी

नगर ः नगर शहरात महापालिका आयुक्‍तांनी लागू केलेला कडक लॉकडाउन काही प्रमाणात शिथिल करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. मात्र, महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी एका दिवसात हा निर्णय बदलला. त्यांनी नगर शहरात पुन्हा एक जूनपर्यंत कडक लॉकडाउन जाहीर केला आहे. आयुक्‍तांचा हा निर्णय नागरिकांच्या टीकेच्या केंद्रस्थानी होता.

महापालिका आयुक्‍त शंकर गोरे यांनी तीन मे रोजी नगर शहरात कडक लॉकडाउन जाहीर केले होते. या कडक लॉकडाउनला 10 मे रोजी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. ही मुदत 15 मे रोजी संपत होती. शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होत असल्याने आयुक्‍त गोरे यांनी शहरातील कडक लॉकडाउन काही प्रमाणात शिथिल करत जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने खुली करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे हातावर पोट असलेले नागरिक व व्यापारी वर्गाला काहीसा दिला मिळाला होता.

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

शनिवारी सकाळी शहरातील रस्त्यांवर खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. दुकानांसमोर रांगा लागल्या होत्या. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. अनेक जण विनाकारण रस्त्यावरून फिरत असल्याचे चित्र दिसत होते. अशीच परिस्थिती राहिली, तर पुन्हा शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची शक्‍यता लक्षात घेत आयुक्‍त गोरे यांनी पुन्हा कडक लॉकडाउनचे आदेश काढले आहेत. एका दिवसात त्यांनी घूमजाव केल्याने ते नागरिकांच्या टीकेच्या केंद्रस्थानी होते.

हे राहणार सुरू

* वैद्यकीय सेवा, औषध दुकाने

* अत्यावश्‍यक सेवेसाठी पेट्रोल पंप

* घरपोच गॅस वितरण सेवा

* सर्व बॅंका

* दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री (सकाळी 7 ते 11)

* पशुखाद्य विक्री (सकाळी 7 ते 11)

* बी-बियाणे, खते व किटकनाशके दुकाने (सकाळी 7 ते 11)

* पीठाची गिरणी

हे बंद राहील

* किराणा दुकाने, तदानुषंगिक मालाची खरेदी-विक्री

* भाजीपाला व फळे बाजार मालाची खरेदी-विक्री

* सर्व खासगी अस्थापना

* अंडी, मटण, चिकन व मासे विक्री

* शेती निगडीत मशिनरी, पंप आदी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India CPI Inflation: देशात पुन्हा महागाईचा भडका! दुष्काळ अन् वाढत्या महागाईत ग्रामीण भागाची दुहेरी होरपळ

IND vs WI: विंडिजच्या दोन खेळाडूंवर ICC ची कारवाई; भारताविरुद्ध T20I मालिका सुरू असतानाच नेमकं काय घडलं?

Rahul Gandhi: राहुल गांधींचा मोठा दावा! म्हणाले, ''मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे मला मेसेज येतात..''

Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर कारखान्याच्या निवडणूकीत सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलची मुसंडी.... विजयाच्या दिशेने घौडदौड.....; पुरुषोत्तम जगताप यांना दारुण पराभव

Sri Lanka Politics: आधी मुलगा, आता पत्नी अडचणीत; महिंदा राजपक्षे ICU मध्ये, श्रीलंकेत सध्या काय घडतंय?

SCROLL FOR NEXT