Strict wages from District Sessions Court for abusing girl 
अहिल्यानगर

‘ही बाब घरी सांगू नको' असे म्हणून पीडित मुलीला धमकी; एकाला सक्तमजुरी

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या गुन्ह्यात दोषी धरत जिल्हा सत्र न्यायालयाने एकाला २० वर्षे सक्तमजुरी व 50 हजार रुपये दंड केला. अफसर लतीफ सय्यद (वय 26, रा. भराड गल्ली, तोफखाना, नगर) असे आरोपीचे नाव आहे. 

अधिक माहिती अशी ः आरोपी अफसर लतीफ सय्यद याने 15 सप्टेंबर 2018च्या अगोदर तीन-चार दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीची छेड काढली. "ही बाब घरी सांगू नको' असे म्हणून पीडित मुलीला धमकी दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आरोपी अफसर सय्यद याने पीडित मुलीवर अत्याचार केला, असे तोफखाना पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आणि तपास करून आरोपींविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. या खटल्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांच्या न्यायालयात झाली. या खटल्यात एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाने मांडलेले पुरावे आणि युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला वरीलप्रमाणे शिक्षा केली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांनी बाजू मांडली. 

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: भयंकर! ४८७ हून अधिक पुरुषांसोबत शरीरसंबंधासाठी दबाव, सिगारेटचे चटके, मारहाण अन्... प्रियकराचं प्रेयसीसोबत पाशवी कृत्य

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरात ६० लाखांहून अधिक किमतीचा गोवंश जप्त; १३१ गोवंशांची सुटका, ८ आरोपींवर ४ गुन्हे दाखल

SRH vs RR Eliminator IPL 2026: वैभव सूर्यवंशीचे वादळ पाहून काव्या मारनच्या चेहऱ्याचा रंग उडालेला... Boss Baby बाद होताच कशी होती तिची रिअ‍ॅक्शन ते पाहा... Video Viral

Koregaon Park Raid : पुण्यात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! वेश्याव्यवसाय करणाऱ्या केनियाच्या 4 तरुणींची सुटका; कोरेगाव पार्क हादरलं

Fuel Price Hike: इंधनाचे दर पुन्हा वाढले! बुधवारी मध्यरात्रीपासून नवीन दरवाढ लागू; पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT