Suffering of tamasha phad Surekha Punekar Folk artists do not get any honorarium ahmednagar sakal
अहिल्यानगर

मोलमजुरी करून पोट भरले; सुरेखा पुणेकर

सुरेखा पुणेकर यांची व्यथा; मानधनही मिळत नाही

सकाळ वृत्तसेवा

अकोले : दोन वर्षे लॉकडाउनमुळे तमाशाचा फड उभा राहिला नाही. शेतात मोलमजुरी करून कसेबसे दिवस काढले, अशी व्यथा दीपाली आणि सुरेखा पुणेकर यांनी मांडली. गोंदोशी येथे आंबादेवीच्या यात्रेला ग्रामस्थांनी पुणेकर यांचा तमाशा आणला होता. यावेळी पुणेकर यांनी आपल्या व्यथा मांडल्या. पुणेकर म्हणाल्या, की सध्या गावोगावी जत्रा सुरू झाल्या आहेत. आताच्या काळात तमाशाला उतरती कळा लागली. दशकापूर्वी तमाशाला साद घालणारे रसिक गावागावांत होते. आज ती परिस्थिती राहिली नाही. तमाशा एक जिवंत कला आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचे देदीप्यमान दर्शन घडविणारे अप्रतिम कलादर्पण म्हणजे तमाशा आहे. मात्र, या कलेच्या जादूला घरघर लागली आहे.

पोटापाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. लावणी, दशावतार, खडी गंमत, झाडी पट्टी या महाराष्ट्राच्या विविध भागांत मनोरंजनासाठी जन्मलेल्या कला आहेत. त्या राज्याच्या विविध भागांत पोचल्या पाहिजेत.

यात्रेच्या दिवशी तमाशाला अफाट गर्दी जमायची. पंचक्रोशीतील लोक तमाशा बघण्यासाठी सहकुटुंब यात्रेत पोचायचे. मात्र, आता डिजिटल माध्यमांमुळे गर्दी कमी झाली. यंदा पाडव्याला आमचा फड उभा राहिला आणि ७५ माणसांच्या कुटुंबाला आधार मिळाला.

सरकार आमदारांना घरे देते. मात्र, लोककलावंतांना मानधनही मिळत नाही. कर्ज मिळत नाही. सावकाराचे कर्ज कसे फेडावे, ही चिंता कायम असते.

- सुरेखा पुणेकर

आतापर्यंत २० तमाशा फडांत काम केले. मात्र, अलीकडे कलेला किंमत राहिली नाही. सरकार लक्ष देत नाही. उपासमारीची वेळ आली आहे.

-शंकरराव म्हस्के, व्यवस्थापक

जन्मापासून मरणापर्यंत तमाशामध्ये काम करीत आहे. वयाची ६५ वी झाली. विधवा आहे. मात्र, अजून आधार कार्ड नाही, कूपन नाही. सरकारी मानधन मिळण्याची अपेक्षा आहे.

-शारदा रेणके, वृद्ध कलाकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: जिथं भविष्याची स्वप्नं पाहिली त्याच शाळेने माझ्या मुलीचा जीव घेतला, चिमुकलीच्या आईचा मन हेलावणारा टाहो!

Supreme Court : आमदार अपात्रतेप्रकरणी आठवड्याभरात निर्णय घ्या; अन्यथा कारवाई करू; सरन्यायाधीशांचा विधानसभा अध्यक्षांना थेट इशारा

Crime: शरीरावर जखमा, फाटलेले कपडे, पुरूषाची चप्पल... रेल्वे स्थानकाजवळ अज्ञात महिलेचा अर्धनग्न मृतदेह अन्..., नेमकं काय घडलं?

Pune Petrol Pump Attack Criminals Arrested : पुण्यात नदीपात्रात दडून बसलेल्या दोन अट्टल गुन्हेगारांना, पोलिसांनी सापळा रचून पकडलं!

Latest Marathi Breaking News:अमित ठाकरे यांची त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यावर पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT