sugarcane Cultivation
sugarcane Cultivation  sakal
अहमदनगर

Sugarcane Cultivation : उसाच्या एकरी उत्पादनात यंदा घट

सतीश वैजापूरकर

शिर्डी : ऊसशेतीच्या इतिहासात पहिल्यांदाच, उसाच्या एकरी उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे यंदा ऊसबागायतदारांची अवस्था ‘नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा’ अशी झाली आहे. गळितासाठी तुटलेल्या उसाचे एकरी वजन जेमतेम वीस ते पंचवीस मेट्रिक टन भरते. उसाचा भाव लक्षात घेता, उत्पादन खर्चाएवढी रक्कमही हाती पडणे जिकिरीचे झाले आहे. ऊसबागायतदारांच्या चेहऱ्यावरील हासू मावळले. भरवशाच्या समजल्या जाणाऱ्या ऊसशेतीवर पहिल्यांदाच अनिश्चिततेचे सावट पसरले. ऊसउत्पादनाचे यंदाचे अंदाज चुकणार असून, नियोजित वेळेच्या किती तरी आधी गळीत हंगाम आटोपतील, अशी भीती जाणकार मंडळी व्यक्त करीत आहेत.

आडसाली उसाचे वजन एकरी तीस ते पस्तीस मेट्रिक टनांच्या पुढे नाही. मोठ्या प्रमाणावर असलेल्या एकसाली उसाचे एकरी उत्पादन पंचवीस मेट्रिक टन आहे. त्यामुळे खोडव्याचे वजन एकरी वीस टनांपेक्षाही खाली जाण्याची शक्यता आहे. अधिक पाऊस, अधिक ऊसउत्पादन, असे या शेतीचे पारंपरिक सूत्र आहे. ऊस हे गवतवर्गीय पीक असल्याने, अधिक पावसात ते जोमाने वाढते. मागील वर्षी वेळेवर व चांगला पाऊस झाल्याने ऊसउत्पादनात दीड ते दोन पट वाढ झाली. यंदाही शेतकऱ्यांची अशीच अपेक्षा होती. मात्र, पदरी घोर निराशा पडली.

आडसाली आणि एकसाली उसाचा एकरी उत्पादन खर्च पन्नास हजार रुपये आहे. वीस मेट्रिक टन उत्पादन आणि अडीच हजार रुपये प्रतिटन भाव मिळाला, तरच केलेला खर्च हाती पडेल. मात्र, कर्जावरील व्याज भरणे मुश्कील होईल. खोडवाउत्पादकांची परिस्थिती त्याहून वाईट आहे. उसाचे घटलेले वजन लक्षात घेता, यंदा उसाची शेती शेतकऱ्यांना खड्ड्यात घालायला निघाली आहे.

ही आहेत कारणे

  • अतिवृष्टीमुळे शेतात सलग तीन महिने पाणी साठले

  • वाफसा मिळेनासा झाल्याने मुळांचे कार्य थांबले

  • सूर्यप्रकाश नसल्याने हरितद्रव्याच्या निर्मितीला अडथळे

  • आर्द्रता वाढली आणि तांबेरा रोगाचा प्रार्दुभाव

  • मुसळधार पावसाने खतांची मात्रा वाहून गेली

  • पिकाची वाढ थांबल्याने उत्पादन घटले

अतिवृष्टीमुळे यंदा दोन-अडीच महिने वाफसा मिळाला नाही, हे वास्तव असले, तरी उसाच्या उत्पादनात एवढी मोठी घट अतिशय धक्कादायक आहे. कृषी शास्त्रज्ञांनी त्याचा शोध घेऊन उपाय शोधायला हवा. उत्तम ऊसशेती करण्याचा माझा पन्नास वर्षांचा अनुभव आहे. मात्र, असे पहिल्यांदाच घडते आहे.

- मच्छिंद्र टेके पाटील, ऊसउत्पादक शेतकरी, वारी, ता. कोपरगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: फाफ डू प्लेसिसचा भन्नाट कॅच अन् धोनीला 16 व्या ओव्हरलाच उतरावं लागलं मैदानात

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT