Suicide of a married woman sakal
अहिल्यानगर

अहमदनगर : एकतर्फी प्रेमातून विवाहितेची आत्महत्या

आरोपी या विवाहितेवर घटस्फोटासाठी बळजबरी करत होता

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : एकतर्फी प्रेमातून विवाहितेस त्रास देऊन तिला आत्महत्येस प्रवृत्त करण्याची घटना नगर तालुक्‍यात घडली. या विवाहितेने मृत्यूपूर्व दिलेल्या जबाबावरून आरोपी अभिमन्यू शिवराम भोसले (वय 23, रा. देऊळगाव सिद्धी, ता. नगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.नगर तालुक्‍यातील एक तरुणीचा विवाह झाला होता. आरोपी अभिमन्यू भोसले या विवाहितेवर घटस्फोटासाठी बळजबरी करत होता. पतीला घटस्फोट देऊन लग्न करण्याची मागणी सातत्याने करत होता.(Accused Abhimanyu Bhosale was forcing her for divorce)

पतीला घटस्फोट न दिल्यास पळून घेऊन जाण्याची धमकी देत होता. विवाहिता ही वडिलांच्या घरी माहेरी आली होती. त्यावेळेस आरोपी अभिमन्यू याने तिच्याशी वाद घातला. तिने या त्रासाला कंटाळून पेटवून घेतले. ती गंभीर भाजल्याने तिला उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिने विशेष न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर पेटवून घेतल्याचे कारण नोंदविले होते. विवाहितेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तिने दिलेला जबाब नगर तालुका पोलिसांकडे हस्तांतरीत करण्यात आला. या विवाहितेच्या जबाबावरून नगर तालुका पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे. पोलिस उपनिरीक एस. बी. बोराडे या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.(married woman died during treatment)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI व्यवहारांवर द्यावे लागणार शुल्क; नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचे संकेत, कारणही सांगितलं...

Karmad News : उघड्या लिफ्टमधून बियाण्याची पोती नेताना तरुणाचा मृत्यू; कंपनी मॅनेजर, एचआर अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा

Delhi Police IPS Transfers : दिल्ली पोलिस दलात मोठा फेरबदल; 5 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती? पाहा बदल्यांची यादी

Bogus Doctor Crime : वारजे, खराडीत बोगस डॉक्टरांवर कारवाई; मनपाच्या बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समितीची कारवाई

Latest Marathi News Live Update : परवानगी नाकारली तरी मुंबईत जाणारच; जरांगेंचा निर्धार

SCROLL FOR NEXT