Suicide of a young woman in Sangamner taluka
Suicide of a young woman in Sangamner taluka 
अहमदनगर

ठरलेला विवाह मोडून फसवणूक केल्याच्या कारणातून युवतीची आत्महत्या, चार जणांविरोधात गुन्हा

आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) : उभय कुटूंबाच्या संमतीने साखरपुडा होवून दागिन्यांसह पैशांची देवाण घेवाणही झाली. मात्र अवघ्या चार महिन्यात विवाहापूर्वीच तिला अपशकुनी ठरवून, विवाहास नकार दिला तसेच, पैसे व दागिने परत नेवून फसवणूक केल्याने, एका युवतीने विहीरीत उडी मारुन आपले जीवन संपवले. भारती भास्कर सांगळे (वय 26, रा. हंगेवाडी, ता. संगमनेर) असे त्या युवतीचे नाव आहे. 

या बाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी, तालुक्यातील हंगेवाडी येथील भारती सांगळे या युवतीचा मृतदेह हंगेवाडी शिवारातील पांडूरंग लक्ष्मण सांगळे यांच्या मालकीच्या विहीरीत आज सकाळी सात पूर्वी आढळून आला. या घटनेचा तपास करताना, पुढे आलेली माहिती अशी, भारतीचा विवाह दोन्ही कुटूंबांच्या संमतीने ठरुन, 30 जून रोजी त्यांचा हंगेवाडी येथे साखरपुडा झाला होता.

आरोपीला एक तोळे वजनाची सोन्याची अंगठी व दोन लाख रुपये विश्वासाने देण्यात आले होते. तर वरपक्षाने तिला दोन तोळे वजनाचे नेकलेस व कानातील दागिने दिले हते. यानंतर 15 जुलैपासून कालपर्यंत आरोपीने भारती व तिचा भाऊ किरण यांच्याशी गोडीगुलाबीने वागून, साखरपुड्यातील दागिने व्यवस्थित करुन आणून देतो, असे सांगून परत नेले होते. 

रविवारी (ता. १) नोव्हेंबरला मयत भारती व तिचा भाऊ किरण अपशकुनी असल्याचे सांगत वरपक्षाने ठरलेला विवाह मोडला. तसेच सांगळे कुटूंबियांना शिवीगाळी व दमदाटी केली तसेच त्यांच्याकडून घेतलेले पैसे व दागिने परत देण्यास नकार दिला. या घटनेमुळे भारती व्यथित झाली होती. यातून तिने टोकाची भुमिका घेत जीवनयात्रा संपवली.

या प्रकरणी किरण भास्कर सांगळे (वय 32)याने आश्वी पोलिस ठाण्यात दिलेल्या खबरीवरून, वरपक्षाकडील चार जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी अरुण मदने, पोलिस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नयन पाटील पुढील तपास करीत आहेत.

संपादन : अशोक मुरुमकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT