Sujay Vikhe Patil says, Ahmednagar leaders are corrupt 
अहिल्यानगर

नगरचे नेते सेटलमेंटवाले, सुजय विखे पाटलांच्या विधानामुळे खळबळ

मार्तंड बुचुडे

पारनेर ः ""जिल्ह्यातील राजकीय नेत्यांना सेटलमेंटची सवय लागलीय. विखे घराण्याने कधीही राजकारणात सेटलमेंट केली नाही. आम्ही जनतेसाठी राजकारण करीत आहोत. सामान्य जनतेसाठी कितीही नुकसान झाले तरी काही फरक पडत नाही; कारण आमचे प्रपंच राजकारणावर चालत नाहीत. आमची तिसरी पिढी राजकारणात आहे. आम्ही कधीही टक्केवारीचे राजकारण केले नाही,'' असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. 

जिल्हा बॅंक निवडणुकीनिमित्त शिवसेनेचे सेवा संस्थेचे उमेदवार रामदास भोसले व बिगरशेती मतदारसंघाचे उमेदवार दत्तात्रेय पानसरे यांच्या प्रचार मेळाव्यात डॉ. विखे पाटील बोलत होते. यानिमित्त तालुक्‍यात जिल्हा बॅंकेसाठी भाजपचा शिवसेना उमेदवारास पाठिंबा असल्याचे जाहीर झाले.

माघारीत खूप काही दडलेलं असतं

डॉ. विखे पाटील म्हणाले, ""आम्ही सहमतीचे राजकारण करतो; सेटलमेंटचे नाही. माझ्याबरोबर सेटलमेंट करण्यासाठी लाइन लागली आहे. ज्या दिवशी विखे घराणे सेटलमेंटचे राजकारण करील, त्या दिवशी सामान्यांची हार झालेली असेल. तालुक्‍यातील राजकारणात अपेक्षेची सवय लागली आहे. राजकारणात अर्थकारण जुळत गेले, तर मी राजकारण सोडून देईन. आम्ही जनतेसाठी सत्तासंघर्ष करतो. "जिल्हा बॅंकेत विखेंची माघार' असे काही वृत्तपत्रांत आले. आम्ही पूर्वीच्या निवडणुकीतही माघार घेतली होती. माघारीचे काही वाटत नाही; कारण त्यातही काही तरी दडलेले असते.'' 

साधेपणाचे फोटो व्हायरल केले तर सोशल मीडिया हँग होईल

डॉ. विखे पाटील म्हणाले, ""आम्ही आमचे फोटो व्हायरल केले, तर सोशल मीडिया हॅंग होईल. आम्ही असे आहोत, असेच राहणार. आम्हाला जनतेला सांगावे लागत नाही, की आम्ही किती साधे आहोत? के. के. रेंजबाबत राजकारण केले गेले. शेतकऱ्यांना सरावाच्या काळातील जमिनीचे भाडे मिळावे, अशी माझी मागणी होती; मात्र त्यात राजकारण आले. आम्हीच शेतकऱ्यांच्या जमिनी सोडविल्या, असे सांगून फटाके वाजविले; पण स्वातंत्र्यापासून शेतकऱ्यांच्या जमिनीची के. के. रेंजमध्ये असणारी स्थिती तशीच आहे.''  विखे पाटलांचा रोख नेमका कोणावर होता, हे लोकांना सांगायची गरज पडली नाही.

औटी पुढच्या वेळी नक्की विजयी होतील

माजी आमदार विजय औटी यांचे काम चांगले असून, पुढील वेळी ते दुप्पट मतांनी विजयी होतील, असा विश्‍वास डॉ. विखे पाटील यांनी व्यक्‍त केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral: विराटनं आधी SRH च्या गोलंदाजांना चोपलं अन् मग मॅच जिंकून बायकोला फ्लाइंग किस दिलं; अनुष्काची रिअ‍ॅक्शन व्हायरल

Solapur Zilla Parishad: सोलापूर जिल्हा परिषद राज्यात आदर्श;‘सेवाकर्मी’त उत्कृष्ट कामगिरी, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सीईओंचा गौरव!

Yavatmal News: शेतकर्!यांना थकबाकी वसुलीचा ‘शॉक’; महावितरण करणार कारवाई; ९५ कोटी रुपयांची वीजबिल थकले

Mohol Bribery Case: ३३ हजारांच्या लाचप्रकरणी तलाठी रंगेहाथ जेरबंद; मोहोळ तालुक्यातील महसूल विभागात खळबळ, अवैध मुरूम उपसा अन्..

Hingoli News: सेलु तालुक्यात यंदा ज्वारीचे उत्पादन घटणार; ज्वारीचा दर साडेचार ते पाच हजारांवर; प्रतिकूल हवामानामुळे परिणामाची चिन्हे

SCROLL FOR NEXT