खासदार सुजय विखे ईसकाळ
अहिल्यानगर

चीनच्या मदतीने विखे पाटील उभारणार अॉक्सीजन प्लँट

भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची माहिती

अशोक निंबाळकर

नगर ः रेमसेडिसिव्हिर इंजेक्शन बेकायदा आणल्याने अडचणीत सापडलेल्या भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी वेगळाच निर्णय घेतला आहे. त्यांनी आता रेमडेसिव्हिरचा नाद सोडून दिला आहे. पदरमोड करून त्यांनी थेट अॉक्सीजनचाच प्लँट उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

कोविड संकटाच्या काळात निर्माण झालेली ऑक्‍सिजन टंचाईची समस्या सोडविण्यासाठी विखे पाटील परिवारातर्फे सुमारे दीड कोटी रुपये खर्च करून ऑक्‍सिजन प्लॅंट उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या दहा दिवसांत हा प्रकल्प कार्यान्वित होणार असल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.

विखे म्हणाले, की सर्वच रुग्णालयांसमोर सध्या ऑक्‍सिजनचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शासकीय पातळीवरूनही ऑक्‍सिजन उपलब्ध होण्याच्या असलेल्या मर्यादा लक्षात घेऊन, विळद घाटात आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प तातडीने उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. संपूर्ण आधुनिक परदेशी तंत्रज्ञान वापरून हा जिल्ह्यातील पहिलाच प्रकल्प ठरणार असल्याचे विखे पाटील म्हणाले.

सद्यःस्थितीत विळद येथील कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्‍सिजन सुविधायुक्त 150 बेड आहेत. नवीन ऑक्‍सिजन प्रकल्प उभारल्यानंतर बेडची संख्या 300 करणार येणार आहे. जिल्ह्यात अवघ्या दहा दिवसांत कार्यान्वित होत असलेल्या या प्रकल्पाचा मोठा दिलासा नागरिकांना मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उर्वरित अॉक्सीजन जिल्हा रूग्णालयास

अॉक्सीजन प्लॅंटसाठी चीनमधून साहित्य मागविले आहे. येत्या दोन दिवसांत ते नगरला येणार आहे. नगर तालुक्यातील विळद घाट येथे हा प्रोजेक्ठ उभारला जाणार आहे. सुमारे दीड कोटी रूपयांचा हा प्रकल्प असेल. देशात प्रथमच एवढ्या कमी वेळात हा प्रोजेक्ट उभारला जात आहे. विळद घाटात विखे पाटील फौंडेशनचे मोठे हॉस्पिटल आहे. तेथील रूग्णांची गरज भागल्यानंतर उर्वरित अॉक्सीजन जिल्हा रूग्णालयास पुरवला जाणार आहे, असेही सुजय विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

रेमडेसिव्हिर इंजेक्शनावरून वाद उदभवला आहे. त्यावर भाष्य करणे त्यांनी टाळले. दुसरीकडे कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT