Sujay Vikhe-Patil Esakal
अहिल्यानगर

Sujay Vikhe-Patil: राजकारणातील कटुता मिटली? रोहित पवारांच्या बॅनरवर झळकले सुजय विखे! एकत्र आल्याचे कारणही स्पष्ट

आमदार रोहित पवार आणि खासदार सुजय विखे पाटील यांचे फोटो असलेला बॅनर झळकला आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याच्या राजकारणात रोज नवीन घडामोडी घडत आहेत. कालचे विरोधक आज एकत्र येत असल्याचे चित्र आहे. आघाडीत किंवा युतीत असणारे नेते एका रात्रीत विरोधात गेल्याचे चित्र आहे. कोणता नेता कुणासोबत जाईल याचा काही नेम नाही. त्यामुळे दोन वेगवेगळ्या पक्षांचे नेते एकत्र आले तरी, अनेकांच्या भुवया उंचावतात. अशात आता राजकीय विरोधक असलेल्या दोन नेत्यांचा फोटो एकत्रित झळकलेल्या बॅनरची चर्चा सुरू झाली आहे.

अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात विखे आणि पवार या घराण्यांचं एकमेकांवर हल्लाबोल राजकारणाच्या माध्यमातून नेहमीच समोर येत असतं. सुजय विखे पाटील हे भाजपकडून खासदार झाल्यानंतर त्यांनी जामखेड मतदारसंघात येऊन रोहित पवार यांच्यावर टीका केली होती.

रोहित पवारही वेळोवेळी भाजपवर निशाणा साधत असताना खासदार या नात्याने सुजय विखे पाटील यांच्यावर टीका करत असतात. मात्र अशातच शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांच्या बॅनरवर भाजप खासदार सुजय विखे यांचा फोटो लागला आहे. यावर सुजय विखे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

'राजकारणामध्ये कटुता न ठेवता विकासासाठी एकत्र यावं लागतं असं खासदार सुजय विखे यांनी म्हंटलं आहे. ते अहमदनगरमध्ये बोलत होते.

'कुणी कुणाचा फोटो लावायचा हा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. कार्यकर्ते कुणाचा फोटो लावतात हे काय कुणाला विचारून लावत नाहीत. एक काळ असा होता माझे फोटो कोणी लावत नव्हतं, आज सगळेच लावतात. हा वैयक्तिक प्रश्न असतो, मात्र विकासाच राजकारण करताना एकत्र यावं लागतं तेव्हाच विकास होतो', असंही विखे म्हणाले आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT