Suvidha Kadalg climb Everest honor of being first woman mountaineer in Sangamner
Suvidha Kadalg climb Everest honor of being first woman mountaineer in Sangamner sakal
अहमदनगर

Suvidha Kadlag : सुविधा कडलगची एव्हरेस्टला गवसणी; संगमनेरमधील पहिल्या महिला गिर्यारोहक

आनंद गायकवाड

संगमनेर : जगाचे सर्वोच्च टोक असलेले माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न प्रत्येक गिर्यारोहक पाहतो. यासाठी चिकाटीने अथक परिश्रम करून या स्वप्नाची पूर्ती संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथील गृहिणी असलेल्या सुविधा राजेंद्र कडलग यांनी केली आहे. नुकतीच बुधवारी ( ता. १७ ) त्यांनी आठ हजार ८४९ मीटर उंच एव्हरेस्टवर चढाई करून अहमदनगर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे.

व्यवसायानिमित्त पुण्यातील बाणेर येथे वास्तव्यास असलेल्या सुविधा कडलग यांना दोन अपत्ये आहेत. बालपणापासून साहसी खेळांची आवड असल्याने चढाई स्पर्धेच्या निमित्ताने सिंहगडापासून त्यांच्या आयुष्याला टर्निंग पॉइंट मिळून सुरू झालेला गिरिशिखरांचा प्रवास माऊंट एव्हरेस्ट या हिमशिखरापर्यंत गेला.

मात्र, या शारीरिक व मानसिक कसोटी पाहणाऱ्या प्रवासात त्यांच्या जिद्दीचीही कसोटी लागली. या सरावासाठी त्यांनी सह्याद्रीच्या रांगांमध्ये शंभरपेक्षा अधिक ट्रेक केले. तसेच अनेक मॅरेथॉन स्पर्धाही गाजवल्या. पुढच्या टप्प्यात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत हिमालयातील गोरीचेन ग्लेशियर,

माउंटन कांगयात्से (६२५० मीटर) आणि माउंटन नून (७१३५ मीटर) शिखरांची मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण करून, त्या दोन मुले व संसाराचा भार पेलणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला गिर्यारोहक ठरल्या. माऊंट नूनच्या यशस्वी चढाईनंतर त्यांना माऊंट एव्हरेस्टने साद घालण्यास सुरवात केली होती. मात्र हा टप्पा आर्थिकदृष्ट्या अत्यंत कठीण असूनही त्यावर मात करीत त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले.

यासाठी कुटुंब आणि पती राजेंद्र यांचे भक्कम पाठबळ व प्रोत्साहन मिळाल्याने त्यांचा उत्साह दुणावला, जिद्द अधिक बळकट झाली. हिमालयातील दोन मोहिमांनी त्यांना हिमशिखरांचे तंत्र व मंत्र शिकवले.

माऊंट एव्हरेस्ट मोहिमेसाठी शारीरिक व मानसिक पूर्वतयारीसाठी त्यांनी जून २०२२ मध्ये बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स केला. द अल्पायनिस्ट या संस्थेचे भगवान चावले व अमोल जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षी एव्हरेस्ट मोहिमेचे आयोजन केले होते. यासाठी सर्व तयारीनिशी त्या सहा एप्रिल रोजी काठमांडूला पोचल्या.

त्यानंतर बेस कॅम्पवर गेल्या. खराब हवामान व वादळामुळे त्यांची मोहीम लांबली. अखेर १२ मे रोजी अंतिम चढाईसाठी सुरवात झाली. मार्गातील सर्व अडथळे यशस्वीरीत्या पार करून सुविधा यांनी १७ मे रोजी एव्हरेस्टच्या शिखरावर तिरंगा फडकावला. सर्वसामान्य कुटुंबातील गृहिणी असलेल्या सुविधा या यशामुळे महाराष्ट्रातील, तसेच अहमदनगर जिल्ह्यातील पहिल्या गृहिणी महिला गिर्यारोहकाचा सन्मान त्यांनी मिळवला आहे. निश्चयाने इप्सिताकडे केलेल्या वाटचालीतून त्यांनी यशाला गवसणी घालीत तालुक्याचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकवले आहे.

सतीश कडलग यांचा सत्कार

आज जवळे कडलग येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात आमदार थोरात यांनी सुविधा यांच्या यशाचा गौरवपूर्ण उल्लेख करीत, प्रातिनिधिक स्वरूपात त्यांचे दीर सतीश कडलग यांचा सत्कार केला.

मोहिमेचा खर्च

या मोहिमेसाठी प्रत्येकी सुमारे ३१ लाख रुपये खर्च येतो. त्यात परवाना शुल्क ९ लाख, एजन्सी फी सव्वातेरा लाख, साहित्य सव्वापाच लाख, शेर्पा १ लाख २० हजार, विमा व औषधे १ लाख, प्रवास ८० हजार व अतिउंचावरील वातावरणासाठी विशेष खाद्यपदार्थ ५० हजार. या मोहिमेसाठी आमदार बाळासाहेब थोरात यांनी ५ लाख, तर तांबे कुटुंबीयांनी ५० हजार रुपयांचे योगदान दिले. उर्वरित खर्चाचा भार त्यांचे पती राजेंद्र व कुटुंबीयांनी पेलला.

जगातील सर्वोच्च हिमशिखराला गवसणी घालण्यासाठी सुविधाने केलेल्या परिश्रमाचे चीज झाले. सुविधाने आमच्या कुटुंबाचे नाव उज्ज्वल केले. त्यामुळे तिचा आम्हा सर्वांना अभिमान आहे.

- राजेंद्र कडलग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Accident News: इगतपुरीच्या भावली धरणात ५ जणांचा बुडून मृत्यू; मृतांमध्ये तीन मुली व दोन मुलांचा समावेश

IPL Qualifier 1: मिचेल स्टार्कची 24 कोटी वसूल करणारी कामगिरी! हेडचा त्रिफळा उडवलाच, पण KKR ला दिली स्वप्नवत सुरुवात

Pune Porsche Accident : पोर्शे कार अपघातातील सीसीटीव्ही फुटेज् अन् आरोपींच्या माहितीचा ताळमेळ बसेना, नेमकं काय झालं?

Bacchu Kadu vs Sachin Tendulkar : तर सचिन तेंडुलकरचा पुतळा जाळणार... बॉडीगार्डनं जीवन संपवल्यानंतर बच्चू कडूंनी साधला निशाणा

Silver Price Update : चांदीचे दर गगनाला भिडले! इराण अन् सौदीत टेन्शन वाढल्याने १ लाखाच्या वर जाणार किंमत

SCROLL FOR NEXT