Ahmednagar  sakal
अहिल्यानगर

Ahmednagar : स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे राज्यव्यापी ऊसतोड व वाहतूक बंद आंदोलन पहिल्याच दिवशी चिघळले

वांबोरी येथे प्रसाद शुगर साखर कारखान्याच्या गव्हाणीत उड्या मारून, कार्यकर्त्यांनी अर्धा तास कारखाना बंद पाडला

विलास कुलकर्णी

राहुरी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे पुकारलेले राज्यव्यापी ऊसतोड व वाहतूक बंद आंदोलन आज (गुरुवारी) पहिल्याच दिवशी अहमदनगर जिल्ह्यात चिघळले. वांबोरी येथे प्रसाद शुगर साखर कारखान्याच्या गव्हाणीत उड्या मारून, कार्यकर्त्यांनी अर्धा तास कारखाना बंद पाडला. राहुरी पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली.

"स्वाभिमानी"तर्फे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज (गुरुवारी) व उद्या (शुक्रवारी) राज्यव्यापी ऊसतोड व वाहतूक बंद आंदोलन पुकारले आहे. कारखान्याचे वजन काटे ऑनलाईन करावेत. एकरकमी एफआरपी द्यावी. मागील वर्षीची एफआरपी अधिक दोनशे रुपये आणि यंदाच्या वर्षी एफआरपी अधिक तीनशे पन्नास रुपये मिळावेत. अशा स्वाभिमानीच्या प्रमुख मागण्या आहेत.

आज (गुरुवारी) सकाळी आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी स्वाभिमानीचे नगर जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी शेतातील ऊस तोडणी बंद करून, रस्त्यावरील उसाची वाहने अडविली. दुपारी कार्यकर्ते आणखी आक्रमक झाले. वांबोरी येथे "प्रसाद शुगर ॲण्ड अलाईड ॲग्रो प्रॉडक्ट्स लिमिटेड" या साखर कारखान्यावर शेकडो शेतकऱ्यांनी हल्लाबोल केला.

कारखान्याचे सुरक्षारक्षक व आंदोलक यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. माहिती समजताच पोलीस पथक हजर झाले. जिल्हाध्यक्ष मोरे यांच्यासह काही शेतकऱ्यांनी थेट गव्हाणीत उड्या मारल्या. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून, आंदोलकांना गव्हाणीतून बाहेर काढले. त्यामुळे, पुढील अनर्थ टळला.

स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, राहुल करपे, सुभाष जुंदरे, किशोर मोरे, राहुल चोथे, पप्पू मोरे, जुगल गोसावी, प्रमोद पवार, सतीश पवार, प्रवीण पवार, सचिन पोळ, अमोल पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना नोटीस बजावून वैयक्तिक जातमुचलक्यावर सोडण्यात आले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दोन दिवस साखर कारखाने बंद ठेवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला सहकार्य करावे. असे निवेदन साखर कारखान्यांना दिले होते. पोलीस बळाचा कितीही वापर केला. तरी, शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन चालू राहील. - रवींद्र मोरे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कार आणि सिमेंट मिक्सर ट्रकची भीषण धडक; ११ जणांचा जागीच मृत्यू; कल्याण अहिल्यानगर हायवेवर दुर्घटना

'अरे किती ते अज्ञान' अभिनेत्रीनं आशाताईंना श्रद्धांजली वाहताना पोस्ट केला लताताईंचा फोटो, नेटकरी ट्रोल करत म्हणाले...'अरे काय हे...'

Babasaheb Ambedkar Birth Anniversary : पिंपरी चिंचवड शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त उद्या वाहतुकीत बदल; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

iPhone 15 मिळतोय फक्त 35 हजारात; खरेदीसाठी उडाली झुंबड, कशी काय सुरुय ही धमाकेदार ऑफर? पाहा कुठे बूक करायचा

MI vs RCB: विराट कोहलीवर BCCI करणार कारवाई? रागाच्या भरात केले 'ते' कृत्य... मग फिल्डिंगला पण आला नाही

SCROLL FOR NEXT