Tadipaar Shivaji Kardile case against adv Abhishek Bhagat is false Prajakt Tanpure Sakal
अहिल्यानगर

Ahmednagar News : शिवाजी कर्डिले यांना तडीपार करा; ॲड. अभिषेक भगत यांच्यावरील गुन्हा खोटा - प्राजक्त तनपुरे

तनपुरे म्हणाले, की ॲड. भगत यांना कर्डिले यांनी जमिनीच्या वादावरून संपविण्याचा प्रकार केला

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. असे असतानाही पोलिस प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. ॲड. अभिषेक भगत यांच्यावरील गुन्हा खोटा आहे.

पोलिस प्रशासन कोणाच्या हातचे बाहुले झाले आहे, कर्डिले यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असतानाही त्यांच्यावर तडीपारीची कारवाई का होत नाही, असा सवाल आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केला.

तनपुरे म्हणाले, की ॲड. भगत यांना कर्डिले यांनी जमिनीच्या वादावरून संपविण्याचा प्रकार केला आहे. याबाबत पोलिसांनी त्यांची तक्रार घेतलेली नाही. त्यामुळे त्यांना न्यायालयात जावे लागले. न्यायालयात जाऊन दाद मागितल्यावर न्यायालयाने कोतवाली पोलिस ठाण्याला यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

तरीदेखील कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी गुन्हा दाखल केला नाही. याप्रकरणी पोलिस उपाधीक्षक अनिल कातकडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. कर्डिले यांच्यावर आठ दिवसांच्या आत गुन्हा दाखल झाला नाही तर आंदोलन करण्यात येईल.

पत्रकार परिषदेला शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, भाजपचे सुवेंद्र गांधी, दिलीप सातपुते, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, जिल्हा परिषदचे माजी सदस्य शरद झोडगे, ॲड. अभिषेक भगत आदी उपस्थित होते.

कार्यवाही न झाल्यास आंदोलन

कर्डिले यांना तातडीने तडीपार करावे, अॅड. अभिषेक भगत यांच्यावर दाखल झालेला अॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा मागे घ्यावा, त्यांच्या जीवितास धोका असल्याने त्यांना त्वरित पोलिस संरक्षण द्यावे, या मागण्यांचे निवेदन तनपुरे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने कातकडे यांना दिले. आठ दिवसांत या मागण्यांवर कार्यवाही झाली, नाही तर पोलिस अधीक्षक कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

भगत यांच्यावर ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल करताना पोलिसांनी वरिष्ठांची परवानगी घेतली नाही. भाजपमध्ये जे नवीन लोक आले आहेत, त्यांच्या हातामध्ये पोलिस यंत्रणा गेली आहे.

- प्राजक्त तनपुरे, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ विरोधात १३ जिल्ह्यांत जमीन मोजणीला वेग?, लातूर, हिंगोलीतून विरोधक एकवटणार; कोल्हापुरातील बैठकीत नेमकं काय घडलं

Mumbai: पनवेल-कर्जत लोकल लवकरच सुरु होणार, दररोज ५० गाड्या धावणार; प्रवाशांना दिलासा मिळणार!

Congress High Drama : "कसले अध्यक्ष?"; विचारताच काँग्रेस कार्यालयात तुफान राडा, नेत्यांवर थेट चप्पल-बुटांचा मारा!

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT