Nilesh Lanke Sakal
अहिल्यानगर

Takli Dhokeshwar News : खंडोबा देवस्थानाचा सुवर्णकाळ सुरू : नीलेश लंके

राज्यस्तरीय ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त असणारे कोरठण खंडोबा गडावर भाविक व ट्रस्ट पदधिकाऱ्यांनी मोठे योगदान दिले.

सकाळ वृत्तसेवा

टाकळी ढोकेश्वर - राज्यस्तरीय ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त असणारे कोरठण खंडोबा गडावर भाविक व ट्रस्ट पदधिकाऱ्यांनी मोठे योगदान दिले. या दर्जामुळे मोठा निधी येथे उपलब्ध झाला. माझ्या माध्यमातून देखील देवस्थानास जोडणाऱ्या रस्त्यांना मोठा निधी मंजूर केला आहे. पर्यटन क्षेत्र विकास योजनेंतर्गत येथे निधी कमी पडून देणार नाही. कोरठण खंडोबा देवस्थानाचा सुवर्ण काळ सुरू आहे, असे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले.

पिंपळगाव रोठा (ता. पारनेर) येथील कोरठण खंडोबा देवस्थान गडावर सोमवती उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. खंडोबा देवाची उत्सवमूर्तीचे सकाळी ११ वाजता मंगलस्नानासाठी पालखी मिरवणूक काढण्यात आली. भाविक भंडारा उधळीत टाक्याचा दराकडे प्रस्थान झाल्यानंतर उत्सव मूर्तींना गंगास्नान संपन्न झाले.

देवाची पालखी मिरवणुकीत आमदार लंके यांनी सहभाग घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी देवस्थानचे अध्यक्ष शालिनी घुले, उपाध्यक्ष महेश शिरोळे, विश्वस्त अ‍ॅड. पांडुरंग गायकवाड, माजी सरपंच अशोक घुले, विश्वस्त राजेंद्र चौधरी, विश्वस्त चंद्रभान ठुबे, जालिंदर खोसे, कमलेश घुले, सरपंच संध्या ठुबे, प्रसाद नवले, चंद्रकांत कुळकर्णी, सुवर्णा घाडगे, अजित महांडुळे, रामचंद्र मुळे, धोंडीभाऊ जगताप, सुरेश फापाळे, दिलीप घुले, महादेव पुंडे, महेंद्र गायकवाड, रफिक शेख उपस्थित होते.

महेश शिरोळे, भाविक निवृत्ती खेडकर, अशोक फापाळे, कुशाभाऊ खोसे यांच्या हस्ते महाप्रसाद देण्यात आला व महाआरती करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati NICU Deaths : अमरावती हादरलं! जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात अतिदक्षता कक्षाला भीषण आग, ३ बालकांचा गुदमरून मृत्यू

मोठी बातमी! बाजार समिती कांदा लिलावासाठी खरेदी करणार बोरामणी हद्दीत ४० एकर जमीन; संचालक मंडळांची मंजुरी, आता पणन संचालकांच्या मान्यतेची प्रतीक्षा

बोगस शालार्थ आयडी! ‘एसआयटी’ने पुन्हा मागितली ३ महिन्यांची मुदतवाढ; ३ लाख कर्मचाऱ्यांच्या पडताळणीस लागतोय वेळ; थर्ड पार्टी तक्रारींवरही आता कार्यवाही

24 ऑगस्ट 2026 पंचांग! श्रावणी सोमवारला आज कोणते शुभ मुहूर्त? जाणून घ्या

आजचे राशिभविष्य - २४ ऑगस्ट २०२६

SCROLL FOR NEXT