In Takli Dhokeshwar, the Lanka-Jhaware group came to power 
अहिल्यानगर

टाकळीत खिलारी गटाला धक्का, लंके-झावरे समर्थकांनी जुळवले जुगाड

सनी सोनावळे

टाकळी ढोकेश्वर ः सरपंच आरक्षण जाहीर होताच तालुक्यातील अनेक मोठ्या गावांत नाट्यमय घडामोडी घडल्या. त्यातील टाकळी ढोकेश्वरमध्ये ही खिलारी गटाची सत्ता येऊनदेखील सरपंच निवडीत ती टिकवता आली नाही 

आमदार नीलेश लंके समर्थक व माजी सरपंच सुनीता झावरे यांच्या गटाने एकत्र येत सत्ता स्थापन केली आहे. सरपंचपदी आमदार नीलेश लंके समर्थक अरूणा खिलारी व उपसरपंचपदी जनसेवा पॅनलमधून निवडुन आलेले सुनील चव्हाण यांची निवड झाली आहे.

टाकळी ढोकेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीत बाजार समितीचे संचालक कटारीया, माजी सरपंच रावसाहेब झावरे, माजी सरपंच सुनिता झावरे यांचे जनसेवा पॅनल व जेष्ठ नेते सीताराम खिलारी यांच्या नेतृत्वाखाली आमदार नीलेश लंके ग्रामविकास पॅनलमध्ये लढत झाली.

जनसेवा पॅनलला ५ जागा व ग्रामविकास पॅनलला १० जागा मिळाल्या होत्या. यातील आमदार नीलेश लंके समर्थक म्हणून ओळखले जाणारे बाळासाहेब खिलारी यांच्या पत्नी अरूणा खिलारी यांच्यासह दत्तात्रय निवडुंगे, प्रियंका बांडे, सुग्राबी हवालदार यांनी ग्रामविकास पॅनलची साथ सोडली. जनसेवा पॅनलला सत्तेचा मार्ग सुकर केला. 

अरूणा खिलारी यांची सरपंचपदी व उपसरपंचपदी सुनील चव्हाण यांची निवड झाली आहे. हे सत्ताधारी पॅनल आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे माजी सरपंच रावसाहेब झावरे,भाऊसाहेब झावरे,बाळासाहेब खिलारी यांनी सांगितले. अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra NCC Crisis: राज्य सरकारच्या लालफीतशाहीमुळे एनसीसी विस्ताराला ब्रेक; दीड लाख छात्रांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण अकादमीचा अभाव, ४०-६० टक्के पदे रिक्त

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक...

Mulshi Aadhaar: आधार अपडेटअभावी मुळशीतील १,२४६ विद्यार्थी अडचणीत; ३० सप्टेंबरच्या डेडलाइनने प्रशासनाची परीक्षा

Kannad Ambadi Dam Water Crisis: अंबाडी धरणातील पाणीसाठा फक्त ८.९१ टक्के; जानेवारीनंतर कन्नड शहर व परिसरात तीव्र पाणीटंचाईची शक्यता

Leopard Attack Nirgudsar: निरगुडसरमध्ये बिबट्याचा हल्ला; ब्रिडिंगसाठी आणलेला ६० हजारांचा बोकड व मेंढी ठार

SCROLL FOR NEXT