Video VIral Sakal
अहिल्यानगर

शिक्षकाची बदली, गावकऱ्यांनी काढली मिरवणूक; थोरामोठ्यांसहित अख्खं गाव रडलं; हृयद्रावक Video

"गुरुजी, नका सोडून जाऊ आमची शाळा..." शिक्षकांची बदली झाल्याने विद्यार्थ्यांना अश्रू अनावर

सकाळ डिजिटल टीम

- उमेश मोरगावकर

पाथर्डी : गुरुजी काहीही करा, पण शाळा सोडून जाऊ नका, असा टाहो फोडत आपल्या शिक्षकांना मिठीत घेऊन धाय मोकलून रडणाऱ्या विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले. हा प्रसंग पाथर्डी तालुक्यातील हनुमाननगर भारजवाडी येथील वस्ती शाळेवर घडला. शाळेचे मुख्याध्यापक लहू बोराटे आणि सहशिक्षक राघू जपकर यांच्या निरोप समारंभप्रसंगी ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

बारा वर्षांपूर्वी बोराटे व जपकर यांची वस्ती शाळेवर नियुक्ती झाली. दोघांचीही पहिलीच नियुक्ती. वस्तीची लोकसंख्या फक्त ४५३. सर्वच जण ऊसतोड मजूर आहेत. शाळेत दोघे शिक्षक रुजू झाल्यानंतर शाळेची पटसंख्या अवघी २० होती. आता ही पटसंख्या ५४ वर गेली आहे. ज्यावेळी दोघांनी शिकवण्यास सुरवात केली, त्यावेळी विद्यार्थी ऊसतोड हंगाम सुरु झाला की पालकांसोबत परगावी जायचे अन हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच विद्यार्थी शाळेत यायचे.

शाळेची इमारत पडकी, बसायला जागा नाही, शैक्षणिक साहित्याचा अभाव, विद्यार्थ्यांना अभ्यासात रुची नाही, अशी सुरवातीची परिस्थिती होती. मात्र या सर्वावर मात करत दोघांनी शाळेचे रूप बदलून टाकले. वस्तीवर मुक्काम ठोकला. विद्यार्थ्यांना ऊस तोडण्यासाठी जाऊ न देता पालकाची भूमिका बजावली.

गुणवत्तेत वाढ केल्याने अनेक विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश मिळाला. शाळा डिजिटल झाली. अनेक विद्यार्थ्यांना तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर बक्षिसे मिळाल्याने अनेक मान्यवरांनी शाळेला भेटी दिल्या. यामुळे वस्तीवर सर्वाचे दोघांशी नाते आपुलकीचे बनले.

दोघांची जामखेड तालुक्यात बदली झाल्याने हा समारंभ आयोजित केला होता. या निरोप समारंभाला सर्व वस्तीवरील नागरिक व विद्यार्थी जमा झाले होते.

प्रमुख अतिथी म्हणून सरपंच माणिक बटुळे, दिलीप खेडकर, सुनील खेडकर उपस्थित होते. निरोप समारंभाचे भाषण करताना विद्यार्थी व पालकांना आपले अश्रू आवरणे कठीण झाले होते. शाळेच्या बाहेर पडताना या दोन्ही शिक्षकांना विद्यार्थ्यांनी घट्ट मिठी मारली अन गुरुजी तुम्ही जाऊ नका, असा टाहो फोडत आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

बारा वर्षांपासून शिक्षकांची व आमची नाळ जुळली होती. गावातील विद्यार्थ्यांसाठी दोघांनीही खूप कष्ट घेतले. लेकीला सासरी पाठवताना जे दुःख होते, त्याच्याही पलीकडचे हे दुःख आहे.

- मल्हारी बटुळे, पालक

आपण काही तरी रचनात्मक काम या ठिकाणी केले आहे. प्रत्येकाला घरातील सदस्य समजले. ही शाळा सोडण्यापूर्वी मला मृत्यू यावा, असे वाटत होते.

- लहू बोराटे, शिक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: कोल्ड्रिफ सिरप (Batch No. SR-13) चा तात्काळ वापर थांबविण्याचे एफडीएचे आदेश

Hampi Tourism: फक्त 2 दिवसात हंपी एक्सप्लोर करायचंय? ही ठिकाणं नक्की पाहा!

INDW vs PAKW: ४,४,४ प्रतिकाने केलेली सुरुवात अन् मग ऋचाच्या आक्रमणाने केला शेवट; भारताचे पाकिस्तानसमोर मोठे लक्ष्य

Jayakumar Gore: रामराजेंचं प्रेम करायचं वय निघून गेलंय: पालकमंत्री जयकुमार गोरे; रणजितसिंहांकडे मैत्रीचा हात पुढे केला अन्..

अब मजा आयेगा ना भिडू! प्रियाचे खरे आई-वडील अखेर सापडलेच; खोटी तन्वी प्रतिमाला त्रास देताना रविराज स्वतः पाहणार, आजच्या भागात काय घडणार?

SCROLL FOR NEXT