Tehsildar Pawar will have to do powerful work 
अहिल्यानगर

तहसीलदार पवारांना करावे लागेल पॉवरफुल्ल काम

संजय आ. काटे

श्रीगोंदे : श्रीगोंद्याला तीन आठवड्यानंतर नवे तहसीलदार मिळाले. जिल्हाधिकारी कार्यालयात अन्नधान्य वितरण अधिकारी प्रदीपकुमार पवार यांच्याकडे ही जबाबदारी आली. श्रीगोंद्याला येण्यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली होती, मात्र पवार यांनी ती भेदली. तहसीलदार म्हणून ही त्यांची पहिलीच नियुक्ती आहे. आता त्यांना आव्हानांची सोडवणूक करताना श्रीगोंदेकरांच्या अपेक्षेला उतरावे लागेल, हे मात्र निश्‍चित. 

तहसीलदार माळी यांच्या जागी येण्यासाठी अनेकांनी राज्य सरकारकडे मोठी फिल्डिंग लावली. स्थानिक नेत्यांनीही त्यांच्या मर्जीतला अधिकारी येथे आणण्यासाठी मुंबईच्या वाऱ्या केल्या. अखेर पवार यांचे नाव निश्‍चित झाले.

पवार मूळचे शिरूर (जि. पुणे) येथील असल्याने, त्यांना श्रीगोंद्याचा सगळा इतिहास माहिती असेल. त्यांच्यापुढे आव्हाने आणि जनतेच्या अपेक्षा आहेत. तालुक्‍यातील वाळूचोरी रोखणे हे मोठे आव्हान असणार आहे. वाळूचोरीमुळे शासनाचा मोठा महसूल बुडत असल्याने, त्याकडे त्यांना लक्ष द्यावे लागणार आहे. 

टोकाच्या राजकारणापासून वाचावे लागेलच; शिवाय सामान्यांच्या अपेक्षाही त्यांना पूर्ण कराव्या लागतील. महसूल विभागात लोकांच्या अडलेल्या कामांचा निपटारा करावा लागेल. मध्यंतरी माजी आमदार राहुल जगताप यांनी प्रलंबित नोंदींचा प्रश्‍न हाती घेतला होता. हा विषय महत्त्वाचा आहे. पुरवठा विभागातील कामे वेळेत होत नसल्याच्याही तक्रारी आहेत. शिधापत्रिका वेळेत मिळत नाहीत. त्यासाठी अनेक दलालांच्या रांगेतून जावे लागते, असेही आरोप होत असल्याने, पवार यांना लक्ष घालावे लागेल. 

आमदारांनाही जपावं लागेल
राज्यात सरकार आघाडीचे; मात्र आमदार बबनराव पाचपुते भाजपचे आहेत. त्यामुळे सरकारमधील स्थानिक नेत्यांना खूश ठेवतानाच, आमदारांचीही कृपादृष्टी ठेवण्याचे कसब तहसीलदार पवार यांना साधावे लागेल. ही कसरत मोठी राहील. पाणीप्रश्नावरून होणारी आंदोलने जहाल असतात. तालुक्‍यातील निवडणुका हाताळताना त्यांना तटस्थ भूमिका घ्यावी लागेल. चांगले काम केले तर मात्र तालुका त्यांना डोक्‍यावर घेईल, हे निश्‍चित. 
संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT