Cheap food grains are supplied to the ration card holders from the ration shops 
अहिल्यानगर

महाराष्ट्रात कोरोनाचं पुन्हा भयानक रुप, एकाच कुटुंबातील 10 जणांना लागण

गौरव साळुंके

श्रीरामपूर (अहमदनगर) : तालुक्यातील ग्रामीण भागातील उंदिरगाव येथे एकाच कुटुंबातील मंगळवारी दहा जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघडकीस आले. सध्या तालुक्यात 25 कोरोनाबाधित रुग्ण ऍक्टिव्ह असून त्यांच्यावर येथील दोन खासगी रुग्णालयासह जिल्हा रुग्णालय आणि बुथ हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरु असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
 
उंदिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिल राजगुरु यांनी दिलेल्या माहितीनुसार, उंदिरगाव परिसरातील हरेगाव रस्ता समोरील एका कुटुंबातील एक जण पुणे येथून प्रवास करुन घरी आल्यानंतर त्याला ताप आला. त्यानंतर त्याने निमगावखैरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून कोविड तपासणी केली. त्यात त्याच्यासह कुटुंबातील चौघेजण कोरोना बाधित आढळून आले. दरम्यान, उंदिरगाव येथील प्राथमिक आरोग्य विभागाने सदर कुटुंबातील अन्य लोकांची कोविड तपासणी केली. त्यात सहा जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. तपासणीनंतर सर्वांना नगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविले आहेत. 

कोरोनाची भीषण लाट अनेक महिन्यानंतर टप्प्याटप्प्याने कमी होत असताना अनेक प्रयत्नानंतर लसही मिळाली. आणि टप्प्याटप्प्याने लसीकरणास सर्वत्र प्रारंभ झाला. प्रारंभी हेल्थ केअर वर्कर्स आणि फर्टलाईन वर्कर्स यांना लस दिली जात आहे. परंतु कोरोनाचा विसर पडल्याने नियमांचे पालन होत नाही. शहरासह ग्रामीण भागात सातत्याने गर्दीचे प्रमाण वाढत असल्याने कोरोनाचा संसर्ग धिम्याचा पावलांनी पुन्हा वाढतो आहे. सर्व जनजीवन सुरळीतपणे सुरु होत असताना अचानकपणे राज्यातील अनेक भागात कोरोनाबाधित रुग्ण झपाट्याने वाढल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या अनेक नागरिक सर्रास विनामास्कचे फिरत असल्याचे जागोजागी दिसून येते. बाजारात, बस स्थानकात, रेल्वे स्थानक परिसरासह शहरात सर्वत्र गर्दीच्या ठिकाणी विनामास्कचे नागरिक हमखास आढळून येतात. त्यातील अनेकजण सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान, तंबाखूजन्य पदार्थ खाऊन खुलेआम थुंकतात. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण होते. त्यामुळे कोरोना विषाणू पुर्णपणे संपत नाही. तोपर्यंत सार्वजनिक ठिकाणी मास्कचा नियमित वापर करणे, शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, आपल्या घरास परिसरात स्वच्छता ठेवणे गरजेचे बनले आहे. 

लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रमासह गर्दीच्या ठिकाणी मास्कचा नियमित वापर करा. कोरोना अद्याप गेलेला नाही. त्यामुळे सोशल डिस्टसिंगच्या नियमांचे विसर पडू देऊ नका. बाहेरुन फिरुन आल्यानंतर न विसरता साबनाने स्वच्छ हात धुवा. साथीच्या रोगांपासून बचावासाठी पुरेशी खबरदारी हाच सर्वोत्तम उपाय असल्याचे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Government Formation Update: बिहारमध्ये सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग ; JDU नेते अमित शहांच्या भेटीला दिल्लीत!

2026 Rashi Bhavishya : 2026 मध्ये या राशींना मिळणार छप्परफाड पैसा ! तुमचीही रास आहे का यात ?

आजचे राशिभविष्य - 16 नोव्हेंबर 2025

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 नोव्हेंबर 2025

Delicious Creamy soup: हिवाळ्यातील थंड सकाळी बनवा गरमागरम क्रिमी सूप, नाश्ता होईल परफेक्ट!

SCROLL FOR NEXT