covid e-pass google
अहिल्यानगर

जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी आता लागणार ई-पास

कोविडचे पेशंट वाढल्याने घेतला निर्णय

सकाळ डिजिटल टीम

श्रीरामपूर : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्यभरात लागू केलेल्या लॉकडाऊन काळात अत्यावश्यक कामानिमित्त जिल्हाबाहेर जाण्यासाठी आता ई-पास लागणार आहे. अत्यावश्यक कामानिमीत्त जिल्हाबाहेर जाण्यासाठी नागरिकांची गैरसोई टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाने ई-पास सुविधा उपलब्ध केली आहे.

ज्या नागरिकांना अत्यंत महत्वाच्या (वैद्यकीय कारण/अत्यावश्यक सेवा/अंत्यविधी) कामानिमित्त घरातून इतर जिल्हाबाहेर जाण्यासाठी https://covid19.mhpolice.in या संकेतस्थळावर जावून आपला फोटो अपलोड करुन अर्ज करावा. तसेच अर्ज करताना घराबाहेर जाण्याच्या कारणासह संबंधित कागदपत्रे जोडावे लागणार असल्याचे अहमदनगर जिल्हा पोलिस दलातर्फे बजावले आहे.

ई-पास मिळविण्यासाठी आॅनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यावर Submit वर क्लिक करावे. त्यानंतर मिळालेला सांकेतिक क्रमांक जतन करून ठेवावा. तसेच सदर संकेतस्थळावर पुन्हा जावून आपला सांकेतिक क्रमांक टाकून ई-पास प्राप्त करण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

बातमीदार - गौरव साळुंके

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shetkari Karj Mafi : ३० जूनची मुदत उलटली; शेतकरी कर्जमाफीला पुन्हा विलंब, नवीन डेडलाईन काय?

Latest Marathi News Live Update : 'बीएलओ' आजपासून आपल्या दारी; रत्नागिरी जिल्ह्यातील १३ लाख मतदारांची पडताळणी

Patan Rain : कोयना पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाचे पुनरागमन; ९.२१ टीएमसी पाणीसाठा

Maharashtra Rain Alert : राज्यात पुढील ५ दिवस जोरदार पाऊस; 'या' भागांत रेड अलर्ट जारी, तुमच्या जिल्ह्यांत कसे असेल हवामान? जाणून घ्या

ढिंग टांग : जोनाथनचा सल्ला..!

SCROLL FOR NEXT