

Maharashtra Latest Marathi News Live Update
esakal
चंद्रपूर, ता. ३० ः कोरोनाचा काळ आठवला की आजही अंगावर शहारे येतात. याच काळात जीव धोक्यात घालून सर्वेक्षण, जनजागृती, गृहभेटी, क्वारंटाईन तपासणीची कामे आशावर्कर, अंगणवाडीसेविका आणि गटप्रवर्तकांनी केली. त्यांच्या कामाची दखल घेत राज्य शासनाने या कंत्राटी कर्मचाऱ्यांना एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता जाहीर केला. मात्र, केवळ एका महिन्याचा भत्ता देण्यात आला. तेवीस महिन्यांचा प्रोत्साहनभत्ता अद्याप देण्यात आला नाही. कोरोना काळात लढणाऱ्या या कर्मचाऱ्यांची राज्य शासनाने थट्टा चालविली आहे.