

Satirical article featuring Jonathan the tortoise sharing his encounter with a high-profile guest in Seychelles
Sakal
मी जोनाथन. मी उदाहरणार्थ १९४ वर्षांचा मध्यमवयीन कासव आहे. पूर्व आफ्रिकेतील हिंदी महासागरातल्या सेंट हेलेना बेटावर आधी राहात होतो, आता सेशेल्सच्या बोटॅनिकल गार्डनमध्ये माझी आलिशान हवेली आहे. एकंदर बरे चालले आहे. या पृथ्वीतलावर कोणीच १९४ वर्षांचे नाही. मी एकटाच! फ्रेडरिक नावाचा माझा जोडीदार होता, पण अल्प आजाराचे निमित्त होऊन वयाच्या १९०व्या वर्षी अकालीच गेला.