पूल कोसळला sakal
अहिल्यानगर

पूल कोसळल्याने दोन गावांचा संपर्क तुटला

रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पूल कोसळला.

विलास कुलकर्णी

राहुरी ( जि. अहमदनगर) : मानोरी-केंदळ या दोन गावांना जोडणाऱ्या, मुळा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याशेजारील पूल कोसळला. त्यामुळे मानोरी, केंदळ, चंडकापूर या तीन गावांचा संपर्क तुटला आहे.

मानोरी बंधाऱ्याशेजारील पूल जीर्ण होऊनही त्यावरून वाहतूक सुरू होती. काल (सोमवारी) रात्री झालेल्या मुसळधार पावसाने ओढे-नाले वाहू लागले. या पाण्याने पूल अखेर कोसळला. यामुळे मानोरी, केंदळ, चंडकापूर गावांचा संपर्क तुटला आहे. पुलाच्या दुरुस्तीसाठी केंदळ व मानोरीच्या ग्रामस्थांनी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे.

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे माजी खासदार प्रसाद तनपुरे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पाठपुरावा करून, २२ लाखांचा निधी मंजूर करून आणला आहे. कामाची निविदा प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे काम वेगाने सुरू करावे, अशी मागणी पंचायत समिती सदस्य रवींद्र आढाव, सरपंच अब्बास शेख, नवनाथ थोरात, गोकुळ आढाव, उत्तम खुळे, बबनराव साळुंखे, वैभव पवार, किशोर जाधव, निवृत्ती आढाव डॉ. राजेंद्र पोटे, पोपट पोटे, श्यामराव आढाव, संभूगिरी गोसावी, बाबासाहेब आढाव, अण्णासाहेब तोडमल यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJPने ५ सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा घेतला मागे; सुप्रीम कोर्टाने विशेषाधिकार वापरत दिलेल्या आदेशानंतर मोठा निर्णय

Mumbai Indians च्या गोटातून ४ महत्त्वाच्या अपडेट्स! हार्दिक पांड्याचे कर्णधारपद गेल्यात जमा, पण...; रोहित शर्मा त्याचा माणूस बसवणार

Raju Shetti Rajesh Kshirsagar : राजेश क्षीरसागर टक्केवारीतला माणूस, ‘असेल दम तर टांगून दाखवाच’; राजू शेट्टींचा पलटवार, शक्तीपीठ महामार्गावरून संघर्ष तीव्र

Supriya Sule: सुप्रिया सुळेंनी विद्यार्थ्यांशी साधला मनमोकळा संवाद; ‘डॉक्टर, इंजिनिअर नको, पोलीस होणार!’

Marathi News Live Updates : उपोषणाच्या चौथ्या दिवशी जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार नाकारले

SCROLL FOR NEXT