महात्मा फुले कृषी विद्यापीठ ई सकाळ
अहिल्यानगर

राहुरी कृषी विद्यापीठाचे मॉडेल देईल एकरी पाच लाखांचे उत्पन्न

रहिमान शेख

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले (mahatma fule) कृषी विद्यापीठातील कृषी विद्या विभागांतर्गत सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्रामार्फत ४६ एकर (acre) क्षेत्रावर एकात्मिक सेंद्रिय शेतीचे रोल मॉडेल विकसित करण्यात आले आहे. गेल्या तीन वर्षांपासून विद्यापीठाचे शास्त्रज्ञ त्यासाठी झटत आहेत.(The integrated farming model will yield an income of Rs 5 lakh per acre)

शेतकऱ्यास वार्षिक किमान पाच ते सहा लाख रूपयांचे खात्रीपूर्वक उत्पन्न कसे मिळविता येईल याबद्दल मार्गदर्शन येथील शास्त्रज्ञ करीत आहेत. हा प्रकल्प देशपातळीवर रोल मॉडेल ठरणार यात शंका नाही, अशी माहिती प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. उल्हास सुर्वे यांनी दिली.

विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, विद्यमान कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, विभाग प्रमुख डॉ. आनंद सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. उल्हास सुर्वे व सेंद्रिय शेती संशोधन प्रकल्पाच्या विविध विभागाची टीमद्वारे विद्यापीठाचा अनेक वर्षापासून पडीक किंवा पारंपारिक लागवड सुरू असलेल्या जमिनीवर या ४६ एकर क्षेत्रावर सेंद्रिय शेती संशोधन सुरू आहे.

येथील पिकांवर विद्यापीठाचेच जिवाणू खते, जैविक कीटकनाशके वापरली जातात. येथे काही क्षेत्रावर बीजोत्पादनासाठी उन्हाळी सोयाबीन, जाम-जेलीसाठी पेरू, पल्पसाठी सीताफळ तसेच उसाच्या चार विविध वाणांची लागवड केलेली आहे. काही क्षेत्रावर भाजीपाला लागवड केलेली आहे, यामध्ये मिरची, कांदा, कोथिंबीर, मेथी तसेच भेंडी अशा विविध भाजीपाला पिकांची लागवड केली आहे. लवकरच येथे देशी गायी, शेळ्या, कोंबड्याचेही पालन सुरू करण्यात येणार आहे, येथीलच प्रक्षेत्रावर सेंद्रिय चारा लागवड करण्यात येणार आहे. विविध सेंद्रीय शेतकऱ्यांना गट करुन प्रशिक्षण देण्यात येणार आहे असे डॉ. उल्हास सुर्वे यांनी सांगितले.

विद्यापीठाला ५० लाखांचे उत्पन्न

तिसऱ्याच वर्षी विद्यापीठाचा सेंद्रिय शेती प्रकल्प स्वयंपूर्णतेकडे : या प्रक्षेत्रावरील पिकांच्या विक्रीद्वारे विद्यापीठाच्या महसुली उत्पन्नामध्ये भरीव वाढ होणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून शासनाचा एक रुपयाही न घेता या प्रकल्पाने स्वयंपूर्णतेकडे वाटचाल सुरू केली आहे. बीजोत्पादनाद्वारे फिरता निधी १८ लाखांचा तसेच विविध पिकांच्या पिकांवरील चाचण्यांद्वारे ३२ लाखांचे उत्पन्न असे एकूण ५० लाखांचे निव्वळ उत्पन्न या प्रकल्पाने मिळविले आहे.(शेतकऱ्यास वार्षिक किमान पाच ते सहा लाख रूपयांचे खात्रीपूर्वक उत्पन्न कसे मिळविता येईल याबद्दल मार्गदर्शन येथील शास्त्रज्ञ करीत आहेत. हा प्रकल्प देशपातळीवर रोल मॉडेल ठरणार यात शंका नाही, अशी माहिती प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. उल्हास सुर्वे यांनी दिली.

विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, विद्यमान कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, विभाग प्रमुख डॉ. आनंद सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. उल्हास सुर्वे व सेंद्रिय शेती संशोधन प्रकल्पाच्या विविध विभागाची टीमद्वारे विद्यापीठाचा अनेक वर्षापासून पडीक किंवा पारंपारिक लागवड सुरू असलेल्या जमिनीवर या ४६ एकर क्षेत्रावर सेंद्रिय शेती संशोधन सुरू आहे.

येथील पिकांवर विद्यापीठाचेच जिवाणू खते, जैविक कीटकनाशके वापरली जातात. येथे काही क्षेत्रावर बीजोत्पादनासाठी उन्हाळी सोयाबीन, जाम-जेलीसाठी पेरू, पल्पसाठी सीताफळ तसेच उसाच्या चार विविध वाणांची लागवड केलेली आहे. काही क्षेत्रावर भाजीपाला लागवड केलेली आहे, यामध्ये मिरची, कांदा, कोथिंबीर, मेथी तसेच भेंडी अशा विविध भाजीपाला पिकांची लागवड केली आहे. लवकरच येथे देशी गायी, शेळ्या, कोंबड्याचेही पालन सुरू करण्यात येणार आहे, येथीलच प्रक्षेत्रावर सेंद्रिय चारा लागवड करण्यात येणार आहे. विविध सेंद्रीय शेतकऱ्यांना गट करुन प्रशिक्षण देण्यात येणार आहे असे डॉ. उल्हास सुर्वे यांनी सांगितले.

विद्यापीठाला ५० लाखांचे उत्पन्न

तिसऱ्याच वर्षी विद्यापीठाचा सेंद्रिय शेती प्रकल्प स्वयंपूर्णतेकडे : या प्रक्षेत्रावरील पिकांच्या विक्रीद्वारे विद्यापीठाच्या महसुली उत्पन्नामध्ये भरीव वाढ होणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून शासनाचा एक रुपयाही न घेता या प्रकल्पाने स्वयंपूर्णतेकडे वाटचाल सुरू केली आहे. बीजोत्पादनाद्वारे फिरता निधी १८ लाखांचा तसेच विविध पिकांच्या पिकांवरील चाचण्यांद्वारे ३२ लाखांचे उत्पन्न असे एकूण ५० लाखांचे निव्वळ उत्पन्न या प्रकल्पाने मिळविले आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर माकडांची एंट्री! घरात गोंधळाचे वातावरण; बचावासाठी पोलिसांसह अग्निशमन दलाला पाचारण

ENG vs IND: भारत-इंग्लंडचे खेळाडू दंडाला काळी पट्टी बांधून लॉर्ड्सवर का उतरले? कारण वाचून जड होईल अंतःकरण

Jalna Campaign: भेसळखोरांविरोधातील धडक मोहिमेला जालन्यात उत्स्फूर्त प्रतिसाद; तुकाराम मुंढेंच्या कौतुकाचे बॅनर शहरभर झळकले

Ghodagaon Police Action: घोडेगाव पोलिसांचा धडाकेबाज तपास: एका दिवसात ४ गुन्ह्यांत ८ आरोपी दोषी, २०२५-२६ मध्ये ४४ प्रकरणांत शिक्षा

Solapur Crime: बोराळे दारूमुक्तीसाठी महिलांचा रस्त्यावर मोर्चा; पंचायत समिती सदस्या जयश्री कवचाळे यांचा अवैध दारूविक्रीविरोधात तीव्र इशारा

SCROLL FOR NEXT