bhagatsingh koshyari sakal
अहिल्यानगर

राहीबाईंचा ‘देशीवाद’ स्वीकारायला हवा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी; आधुनिक सीतामाता म्‍हणून गौरव

सकाळ वृत्तसेवा

अकोले : राहीबाई म्हणजे आधुनिक युगातील सीतामाताच आहेत. राहीबाई यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उभे केलेले काम हे देशातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे. या कामासाठी त्यांना मिळालेला पद्मश्री पुरस्काराचा आम्हाला अभिमान आहे. आधुनिक युगात सकस आणि शुद्ध अन्न प्रत्येकाच्या ताटात जाण्यासाठी राहीबाईंचे विचार स्वीकारावेच लागतील, असे गौरवोद्‌गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काढले.

राहीबाई पोपेरे यांचा राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर आमदार आशिष शेलार, ॲडराईज इंडिया व वंदे भारत विकास फाउंडेशनचे संस्थापक प्रसाद कुलकर्णी, अनिरुद्ध हजारे, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

देश अन्न-धान्याच्या बाबतीत आयातदार असल्याचे आपण पहिले आहे. त्या काळात देशात अमेरिकेकडून निकृष्ट गहू येत होता. भारताने गेल्या ४०-५० वर्षांत कृषी क्षेत्रात मोठी प्रगती केली नसती, तर कोरोना संकटात अर्थव्यवस्था ठप्प असताना हजारो लोक उपासमारीचे बळी झाले असते. कृषी विद्यापीठांनी शेतीचे आधुनिक ज्ञान व तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी पुढाकार घ्यावा, यासाठी आपण सर्व कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंना सूचना करू.

हायब्रिड बियाणे, तसेच रासायनिक शेतीमुळे अनेक आजार वाढले आहेत. त्यामुळे आपल्या भावी पिढ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करावी. प्रत्येक गावात देशी वाणाची बीज बँक असावी, असे राहीबाई यांनी सांगितले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते राहीबाई पोपेरे, विदर्भातील संत्रीउत्पादक शेतकरी धीरज जुनघरे, डॉ. सदानंद राऊत, शेती हवामानतज्ज्ञ डॉ. उदय देवळाणकर, प्रगतिशील शेतकरी ज्ञानेश्वर बोडके, शेती दूरस्थ शिक्षणाचे प्रणेते डॉ. सूर्यकांत गुंजाळ, कृषी पर्यटन तज्ज्ञ चंद्रशेखर भडसावळे, कुलगुरू डॉ. संजय सावंत, महाराष्ट्र राज्य पणन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील पवार यांचा सन्मान करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी सरकार हिंदू-मुस्लिम कार्ड खेळतंय... राहुल गांधी सकारात्मक विचाराचे! Shahid Afridi च्या विधानाचा BJP कडून समाचार

Bigg Boss 19 : बिग बॉस 19 मध्ये दोन स्पर्धकांनी घातला राडा; कायमचे झाले नॉमिनेट, काय घडलं नेमकं जाणून घ्या

Latest Marathi News Updates : कुणबी प्रमाणपत्रासाठी काटेकोर पडताळणी अनिवार्य - बावनकुळे

Hingoli News : चार वर्षानंतरच्या मुहूर्ताला पालकमंत्र्यांचा खोडा; शिक्षक पुरस्काराचे वितरण पुढे ढकलले

Jintur Heavy Rain : येलदरी धरणातून २३ हजार ८०० क्युसेक विसर्ग; नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT