घाटघर
घाटघर 
अहमदनगर

वीज बनवणारा घाटघरच पंधरवड्यापासून अंधारात

अशोक निंबाळकर

अकोले : राज्यात घाटघर येथे ऊर्जानिर्मितीचा अभिनव असा २५० मेगावॅट रिसायकलिंग प्रोजेकट उभारला यातून मोठ्या प्रमाणात वीज निर्मितीही सुरू झाली आहे. कोट्यवधी रुपये महसूल सरकारच्या तिजोरीत जमा होत आहे. मात्र, केवळ साडेबारा हजार बिल थकल्याने वीज मंडळाने या जलाशयाची वीज खंडित केल्याने हा जलाशय गेली पंधरा दिवसापासून अंधारात आहे. (The power connection of Ghatghar project was cut off)

वीज कर्मचारी वर्गासाठी जी भंडारदरा कॉलनी आहे, तिचेही चार लाख दहा हजार बिल थकल्याने कॉलनी वीज खंडित झाल्याने अंधारात आहे. या बाबत वीज प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र महाजन यांचेशी संपर्क केला असता आपणाला वीज खंडित झाल्याचे माहित नसल्याचे सांगितले. त्यामुळे भंडारदरा अधिकारी व अधिकारी नसल्याचे चित्र दिसले, तर वीज मंडळाचे सहायक कार्यकारी अभियंता मेवाडे यांनी गेली पंधरा दिवसापासून रोज मोबाईलवरून कळवूनही संबंधित अधिकारी बिल भरत नसल्याने नाविलाजास्तव वीज खंडित करावी लागली आहे.

सध्या कोरोना संसर्ग असून विधार्थी घरातूनच ऑनलाईन अभ्यास करत आहे. वीज नसल्याने अंधार तसेच संगणक बंद त्यामुळे विधार्थी अभ्यास करू शकत नाही भंडारदरा कॉलनीत शिक्षक, बँक कर्मचारी, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी राहतात त्यांनाही काम करणे अशक्य झाले आहे. कॉलनीत प्रवरा आरोग्य प्रकल्प असून हा आरोग्य प्रकल्पही अंधारात चाचपडत आहे.

हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्प व सिव्हिल पाटबंधारे विभाग यांनी कॉलनीत राहणाऱ्या भाडेकरू यांचेकडून भाडे वसुली केली. मात्र, वीज बिल भरले नाही त्यामुळे वीज खंडित झाली आहे. समन्वय नसल्याचे हे उदाहरण आहे. या बाबत भंडारदरा येथील सरपंच पांडुरंग खाडे यांनी नाराजी व्यक्त करीत या बाबत चौकशीची मागणी केली आहे.

घाटघर प्रकल्प वीज निर्मिती २४ तास वीजनिर्मिती करूनही चुकीच्या नियोजनामुळे केवळ साडेबारा हजार रुपये बिलापोटी घाटघर उदंचन प्रकल्प अंधारात आहे. (The power connection of Ghatghar project was cut off)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT