RSS sakal
अहिल्यानगर

कोरोना संकटात संघाचे मोठे काम ; कुमावत

कोरोना महामारीत भारतीय समाज खंबीरपणे एकमेकांच्या पाठीशी उभा राहिला.

सकाळ वृत्तसेवा

राहुरी : ‘‘वसुधैव कुटुंबकम्‌ या संस्कारामुळे संपूर्ण विश्वाला आपण परिवार मानतो. त्यामुळे कोरोना महामारीत भारतीय समाज खंबीरपणे एकमेकांच्या पाठीशी उभा राहिला. या संकटातही संघ स्वयंसेवकांनी समाजहितासाठी काम केले,’’ असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उत्तर जिल्हा सहकार्यवाह योगेश कुमावत यांनी केले.

राहुरी येथे काल (बुधवारी) शहरात स्वयंसेवकांनी पथसंचलन केले. नागरिकांनी पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात कुमावत बोलत होते. प्राचार्य जगदीश मुसमाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कुमावत म्हणाले, की भारतावर अनेक आक्रमणे झाली, परंतु देशाभिमानी राष्ट्रपुरुषांनी ती परतवून समाजाला संकटातून बाहेर काढले. संकटात दुसऱ्याला मदतीची शक्ती तयार झाल्याने, कोरोना संकटात देशात, परदेशांत आपण मदत केली.

प्रा. मुसमाडे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी संघ स्वयंसेवकांनी सूर्यनमस्कार व विविध खेळांची प्रात्यक्षिके सादर केली.

-------------------------------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET 2027: पुढच्या वर्षीच्या नीट परीक्षेत होणार 'हे' बदल! वर्षातून अनेकवेळा परीक्षा होण्याची शक्यता

Pankaja Munde : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा पालकमंत्र्यांसमोर आक्रोश, सरकार शेतकरी-पशु पालकांच्या पाठीशी

CBSE Three Language Policy : सीबीएसईच्या सहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! त्रि-भाषा धोरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; काय दिले निर्देश?

Alegaon Murum Mining: आळेगाव पागा मुरूम उत्खनन प्रकरण: पंचनाम्यातील आकडे संशयास्पद, पर्यावरणप्रेमींची सखोल चौकशीची मागणी

Pitru Paksha 2026 : पितृपक्षात श्राद्धाचं जेवण कसं असावं? शास्त्रानुसार काय वाढावं आणि काय टाळावं जाणून घ्या

SCROLL FOR NEXT