Sangamner market committee Images by sakal
अहिल्यानगर

संगमनेर बाजार समितीत प्रवेशावर निर्बंध

कोविडच्या दुसऱ्या प्रभावी लाटेने राज्यात थैमान घातले आहे.

सकाऴ वृत्तसेवा

संगमनेर (अहमदनगर) : शहर आणि तालुक्‍यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन संगमनेरच्या कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात होणारी गर्दी टाळण्यासाठी, बाजार समितीने सुरक्षेच्या उपाययोजनांचा अवलंब सुरू केला आहे. गर्दीमुळे होणारा कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रवेशद्वारावर वाहनांचे निर्जंतुकीकरण, वाहनचालकासह फक्त एका शेतकऱ्याला प्रवेश आदी उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती सभापती शंकर खेमनर व सचिव सतीश गुंजाळ यांनी दिली.

कोविडच्या दुसऱ्या प्रभावी लाटेने राज्यात थैमान घातले आहे. कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा, टोमॅटो, डाळिंब यांसह फळे व पालेभाज्या बाजार समितीत आणतात. यादरम्यान शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी यांची मोठी गर्दी होते. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी व्यवस्थापनाने बाजार समितीतील सर्वच घटकांना खबरदारी घेऊन कठोर पावले उचलण्याच्या सूचना केल्या आहेत. मास्कशिवाय कोणालाही आत प्रवेश दिला जात नाही. लहान मुले, वयोवृद्धांना प्रवेशबंदी करण्यात आली असून, या निर्बंधाचे पालन करण्याचे आवाहन बाजार समिती व्यवस्थापनाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT