कोविड सेंटर गुगल
अहिल्यानगर

शिर्डीबाबत सरकारची झोळी फाटकी, बेतले १७ रूग्णांच्या प्राणावर...

संस्थानने राज्य सरकारला ५१ कोटी रूपयांची मदत केली

सतीश वैजापूरकर

शिर्डी ः "काळ आला होता; पण वेळ आली नव्हती,' या म्हणीचा प्रत्यय (ता. 27) साईसंस्थानच्या कोविड रुग्णालयात आला. ऑक्‍सिजनअभावी 17 रुग्णांचा श्‍वास थांबण्याची वेळ आली; मात्र रात्र जागून काढत, युद्धपातळीवर "ऑपरेशन शिफ्टिंग' राबवून या रुग्णांना सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलविण्यात आले. कोविड संकटात मायबाप सरकारला तब्बल 51 कोटी रुपयांची देणगी देणाऱ्या साईसंस्थानवर हा प्रसंग गुदरला तर सामान्यांची काय कथा, याचीच प्रचिती आली.

ऑक्‍सिजनअभावी रात्री एवढे रामायण घडूनही काल अवघे चार ऑक्‍सिजन सिलिंडर मिळाले. रोज शंभर रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनची गरज असताना गेल्या चार दिवसांत सरासरी अकरा मिळाले. जिल्ह्यात सर्वाधिक कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या आणि त्यासाठी सर्वांत मोठी यंत्रणा उभारणाऱ्या साईसंस्थानची उपेक्षाच सुरू आहे.

येथे सहाशेहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. धर्मशाळेत उपचार घेत असलेल्या रुग्णांना पुरेसा ऑक्‍सिजन न मिळाल्याने काल त्यांचा जीव टांगणीला लागला. सुपर स्पेशालिटी रुग्णालयात त्यांच्यासाठी युद्धपातळीवर वॉर्ड उभारून ऑक्‍सिजनची व्यवस्था करण्यात आली. संस्थानच्या रुग्णालयात ऑक्‍सिजनचे 120, तर व्हेंटिलेटर सुविधा असलेले वीस बेड आहेत.

संगमनेर येथून होणारा ऑक्‍सिजनचा पुरवठा बंद झाला. नगर येथून आणायचा, तर तेथेही आपापल्या मतदारसंघात ऑक्‍सिजन नेण्यासाठी लोकप्रतिनिधी आग्रही आहेत. त्यामुळे संस्थानसाठी आग्रह धरायचा कुणी, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

सर्वसामान्यांचा आधार

साईसंस्थानचे रुग्णालय हा सर्वसामान्य कोविड रुग्णांना एकमेव आधार आहे. सध्याच्या संकटात तेथे सर्वाधिक रुग्णसंख्या आणि उपचार मोफत आहेत. किमान धर्मशाळेतील रुग्णालयासाठी पुरेसा ऑक्‍सिजन पुरवठा आणि पुरेशी रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन मिळायला हवीत.

- डॉ. राजेंद्र पिपाडा, भाजप नेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th pay commission : १२ लाख कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा ! १८ हजार रुपये बोनससह महागाई भत्ता अन् बरंच काही...

Success Story: जिल्हाधिकारी होण्याचं बालपणीचं स्वप्न... अपयश आलं, नोकरी सोडली, पण जिद्द सोडली नाही; ऐश्वर्यम UPSCत देशात १०वी

Yavatmal Healthcare: १०२ वर वारंवार फोन, तरी रुग्णवाहिका आली नाही; राळेगावात जंगलातच महिलेची प्रसूती

Marathi News Live Updates : लोहगावमध्ये रस्त्यावरील खड्ड्याला चक्क चिकटपट्टी लावून पुणेकराचे अनोखे आंदोलन, महापालिकेच्या कारभाराचा जाहीर निषेध

दीड तासांचा प्रवास ५ मिनिटांत पूर्ण होणार! वर्सोवा केबल-स्टेड पुलास हिरवा कंदील, २१ किमीचे अंतर अवघ्या दीड किमीवर

SCROLL FOR NEXT