shevgaon youth images 
अहिल्यानगर

शेवगाव : कोवीड सेंटरला दानशूर व्यक्तींकडून ७० हजारांची मदत

ही रक्कम नुकतीच गटविकास अधिकारी महेश डोके व तालुका आरोग्य अधिकारी डाँ. सलमा हिराणी यांच्याकडे संबंधीतांनी सुपूर्द केली आहे.

सकाऴ वृत्तसेवा

शेवगाव (अहमदनगर) : कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेवून प्रशासनाने सुरु केलेल्या कोवीड सेंटरमध्ये सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी विविध क्षेत्रातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेतला असून आतापर्यंत ७० हजार रुपयांची रक्कम जमा झाली आहे. ही रक्कम नुकतीच गटविकास अधिकारी महेश डोके व तालुका आरोग्य अधिकारी डाँ. सलमा हिराणी यांच्याकडे संबंधीतांनी सुपूर्द केली आहे.

कोरोना संसर्गाची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने तालुक्यातील बाधीत रुग्णांना नगर व इतर शहरात उपचारासाठी जावे लागू नये व तेथील गंभीर परिस्थितीमध्ये रुग्णांची हेळसांड होवू नये. या दृष्टीने तालुका प्रशासनाने डाँ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतीगृह येथे ७५ व त्रिमुर्ती शैक्षणिक संकुलात १५० बेडचे कोवीड सेंटर सुरु केले आहे. मात्र तेथे मुलभूत व आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध करण्यासाठी मोठया प्रमाणावर निधीची अडचण असल्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींना मदतीसाठी आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार गेल्या दोन तीन दिवसापासून या सेंटरमधील सुविधांसाठी विविध क्षेत्रातील व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते पुढे सरसावले असून त्या माध्यमातून ७० हजाराची रक्कम जमा झाली आहे.

भक्ती नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष राहुल मालुसरे यांनी स्वत:च्या मुलीच्या वाढदिवसाचा खर्च टाळून २१ हजार रुपये, व्यंकटेश उदयोग समुहाचे अनिल गुंजाळ यांनी ११ हजार रुपये, जनशक्ती मंचचे शहराध्यक्ष सुनिल काकडे यांनी ११ हजार रुपये, कुलदीप फडके यांनी ११ हजार रुपये, सचिन लांडे, अतुल लांडे, प्रविण भास्कर यांनी प्रत्येकी ५ हजार रुपये अशी सुमारे ७० हजार रुपयांची रक्कम बुधवारी (ता.१४) रोजी सकाळी गटविकास अधिकारी महेश डोके व तालुका आरोग्य अधिकारी डाँ. सलमा हिराणी यांच्याकडे सुपूर्द केली.

तालुक्यातील कोवीड केअर सेंटरसाठी नोडल आँफीसर म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी शैलेजा राऊळ या काम पहात आहेत. यापुढील काळात संभाव्य वाढती रुग्ण संख्या लक्षात घेवून सेंटरमधील बेडची संख्या व सुविधा वाढवण्याची गरज उत्पन्न होणार असल्याने तालुक्यातील दानशुर व्यक्तींनी यासाठी वस्तू व आर्थिक स्वरुपातील मदत करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन गटविकास अधिकारी डोके यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs ZIM: कसोटी क्रिकेटला मिळावा नवा 'त्रिशतकवीर'! द. आफ्रिकेच्या कर्णधाराने गोलंदाजांना झोडपत नोंदवले वर्ल्ड रेकॉर्ड

Stock market News : ‘MRF’ स्टॉकशी पुन्हा बरोबरी केली ‘या’ शेअरने! ; 3 रुपयांवरून थेट 300000 पर्यंत वाढली होती किंमत अन् आता...

राम कपूरच्या 'मिस्त्री' मध्ये झळकतोय मराठमोळा अभिनेता; मराठीत दिलाय कोट्यवधींचा सिनेमा

Latest Maharashtra News Updates : नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ

Thane News: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून विद्यार्थी पडले, दोन मुले गंभीर जखमी; ठाण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT